Homeसाहित्यआनंदधारा …

आनंदधारा …

नमस्कार मंडळी.
4 जुलै 2026 रोजीच्या माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवर, स्नेही, आप्तजन, मित्र मंडळी, न्यूज स्टोरी टुडे परिवारातील लेखक, लेखिका, कवी, कवयित्री आदींनी भरभरून शुभेच्छा दिल्याबद्दल या सर्वांचा मी ऋणी आहे. या इतक्या सार्‍या शुभेच्छा म्हणजे तर मला सध्या कोसळत असलेल्या प्रचंड जलधारांबरोबर मिळालेल्या आनंदधारा वाटत आहेत. या निमित्ताने आपल्या सर्वांच्या जीवनातही आनंदधारा बरसत राहो, या हार्दिक शुभेच्छा.

काही हितचिंतकांनी मराठी बरोबरच संस्कृत, हिंदी, इंग्रजी भाषेतूनही शुभेच्छा दिल्या आहेत. या  बहुभाषिक तसेच देश विदेशातून प्राप्त झालेल्या शुभेच्छा म्हणजे आपल्या न्यूज स्टोरी टुडे परिवाराचे ब्रीदवाक्य असलेल्या “हे विश्वची आपुले घर”:यास अनुसरूनच आहेत. काही  निवडक शुभेच्छा पुढे देत आहे.
1
सुप्रभात..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

सुदिनं सुदिनं जन्मदिनम् तव,
भवतु मंगलम् जन्मदिनम् |
विजयी भव सर्वत्र सर्वदा,
भवतु मंगलम् जन्मदिनम् ||
जीवेत शरदः शतम
वर्धेत शरद शतम
पश्येत शरद् शतम
नंदेत शरद् शतम !!
दीर्घायुष्यमस्तु!
आरोग्यमस्तु!
मनेप्सित मंगलकामना सिद्धिरस्तु!
स्वत्यस्तु ते कुशल मस्तु चिरायुरस्तु॥
विद्या विवेक कृति कौशल सिद्धिरस्तु l
ऐश्वर्यमस्तु बलमस्तु राष्ट्रभक्ति सदास्तु॥
वन्शः सदैव भवता हि सुदिप्तोस्तु ॥

जन्मदिनमिदम् अयि प्रिय सखे
शंतनोतु हि सर्वदा मुदम् ।
प्रार्थयामहे भव शतायु:
ईश्वर सदा त्वाम् च रक्षतु।
पुण्य कर्मणा कीर्तिमार्जय
जीवनम् तव भवतु सार्थकम् ।

“जीवेत शरद: शतम”
— सुधीर जोगळेकर, अलका जोगळेकर
2
श्रीयुत देवेंद्रजी भुजबळ साहेब,
संपादक, न्यूज स्टोरी टुडे
आपणास वाढदिवसा निमित्त हार्दिक शुभेच्छा. 🌹🍿🍿🌹🎂🎂🌹
आज ४, जुलै देवेन्द्रजी यांचा वाढदिवस म्हणजे स्फूर्तीदिन होय. खरं तर निवृत्ती नंतर कामाचा वेग मंदावतो पण देवेंद्र जी च वेगळच आहे आपल्या कामाचा प्रचंड वेग वाढला आहे ते पाहून थक्क व्हायला होते प्रत्येक आपला क्षेत्रातील वावर आपल्या कामाची कार्यशैली पाहून इतरांना ही स्फूर्ती येते. न्यूज स्टोरी टुडे. माध्यमातून एक मोठा परिवार निर्माण केला आहे आणि सर्वांशी संपर्कात राहून देश विदेशात विचारांची देवाण घेवाण होत आहे यातूनच नवीन संकल्पना, नव नवीन विचार सर्वांना सहज उपलब्ध करून त्यांना एक नवीन दिशा देण्याचे काम आपण सातत्याने करत आहात. साहित्यिक, लेखक मंडळींना आणि वाचक वर्गास ही आपले विचार मांडण्याचे व्यासपीठ निर्माण करुन दिले आहे यात महत्त्वपूर्ण घडामोडी, दिशादर्शक विचार प्रेरणादायी व्यक्तिमत्व, व्यक्तिमत्व विकास, मनोरंजन, काव्य रचना हे विषय वाचायला मिळतात ही वाचकांसाठी एक मेजवानीच आहे. ही किमया इतरांना प्रचंड स्फूर्ती देणारी आहे आपल्या या कामात सामाजिक बांधिलकी जपत, सामाजिक कार्यातून आपल्या पत्नी, सौ. अलकाताई यांचाही मोठा सहभाग,योगदान आहे. त्याही सातत्याने आपले विचार मांडत असतात. तेही अनेकांच्या जीवनात प्रकाश  निर्माण करून त्यांना सुंदर आणि आनंदी जीवन जगण्याचा संदेश देत असतात आपल्या या उभयतांच्या महान कार्याला सलाम.
आपणास वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतानाच आपले व आपल्या परिवाराचे आरोग्य उत्तम राहो, सुख समृद्धी लाभो, तसेच दीर्घायुष्य लाभो, हीच स्वामी चरणी प्रार्थना. 🌹🎂🎂🌹🍿🍿🌹
— दीपक जवकर आणि परिवार, डोंबिवली.

3
नमस्कार देवा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जीवेत शरदः शतम्।
— विसुभाऊ बापट. कुटुंब रंगलय काव्यात फेम
4
निवृत्त माहिती संचालक, कुटुंबाचे मित्र आणि जवळचे नातेवाईक आदरणीय श्री देवेंद्र भुजबळ यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
आपली मैत्री, आपुलकी आणि स्नेह हे आमच्या साठी नेहमीच प्रेरणादायी राहिले आहेत. आपल्या प्रदीर्घ प्रशासकीय कारकिर्दीतील कार्य, संयमी व्यक्तिमत्त्व आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी निश्चितच अनुकरणीय आहे.
ईश्वरचरणी प्रार्थना की, आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख, समाधान आणि निरंतर यश लाभो. आपल्या मैत्रीचा सहवास आणि मार्गदर्शन आम्हाला असेच लाभत राहो.
वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा ! 💐🍫🌸🌷🌾💥⭐🌈
— डॉ मनीषा व नितीन चाळसे. पुणे
5
अष्टपैलू, झुंजार, तडफदार, कार्यक्षम व्यक्तिमत्त्वाच्या माध्यमतज्ञ श्री देवेंद्र भुजबळ, यांना वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन.
— सुधाकर तोरणे. निवृत्त माहिती संचालक, नाशिक
6
आदरणीय
माध्यम भूषण,
देवेन्द्र भुजबळ सर,
आपल्याला वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक  शुभेच्छा ! 🌹
केंद्र आणि राज्य शासनाच्या प्रसिद्धी विभागात कार्यरत असताना आपण आपल्या कर्तृत्वाने, अभ्यासू वृत्तीने, प्रामाणिक सेवाभावाने आणि माध्यम क्षेत्रावरील निष्ठेने एक स्वतंत्र व आदर्श स्थान निर्माण केले. सेवाकाळात ज्या समर्पणाने आपण कार्य केले, त्याच ऊर्जेने आणि तितक्याच उत्कटतेने सेवानिवृत्तीनंतरही “न्युज स्टोरी टुडे” च्या माध्यमातुन आपण माध्यम क्षेत्राशी असलेले आपले नाते अधिक दृढ केले आहे.

आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा दूरदृष्टीने स्वीकार करून माहिती, संवाद आणि जनजागृतीची नवी दालने आपण खुली केली. आपल्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा लाभ असंख्य पत्रकार, छायाचित्रकार, जनसंपर्क अधिकारी आणि नव्या पिढीतील माध्यमकर्मी यांना सातत्याने मिळत आहे. निःस्वार्थ वृत्तीने प्रत्येकापर्यंत पोहोचून मार्गदर्शन करण्याची आपली परंपरा खरोखरच प्रेरणादायी आहे.

आपले व्यक्तिमत्त्व म्हणजे अनुभव, अभ्यास, साधेपणा, संवेदनशीलता आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम आहे. माध्यम क्षेत्रातील आपले मोलाचे योगदान आमच्यासारख्या अनेकांसाठी प्रेरणेचा अखंड स्रोत आहे. आपल्या कार्याचा आम्हाला मनापासून अभिमान आहे.

ईश्वरचरणी प्रार्थना की, आपणास उत्तम आरोग्य, निरामय आयुष्य, अखंड उत्साह आणि अशीच समाजोपयोगी, प्रेरणादायी कार्य करण्याची शक्ती लाभो. वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा !
आपला स्नेहांकित,
— प्रकाशचित्रकार, विजय होकर्णे. नांदेड
7
देवेन्द्रजी, वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सेवानिवृत्तीनंतरही अधिक जोमाने कार्यकुशलतेने, उत्साहाने विविधरंगी विषयावर स्वतःच्या माध्यमातून भाष्य करण्यासाठी कार्यप्रवण झालेल्या देवेन्द्रांनी “सेवानिवृत्ती हा पूर्णविराम नाहीतर स्वल्पविराम” असल्याचं सिध्द केलं आहे.
यापुढील वाटचालीतही अशाच जोमाने, ताकदीने कार्यरत राहाण्यासाठी आपल्याला आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा. 💐💐🎂💐💐
— वीणा गावडे. मा. मुख्यमंत्र्याच्या माजी जनसंपर्क अधिकारी, मुंबई.

8
💐💐💐💐💐💐💐 वाढदिवसाच्या कोटी कोटी अगणित अगणित हादीॅक हादीॅक शुभेच्छा अनेक सन्मानाने सन्मानित श्री.देवेंद्र भाऊजी 🎂🎂🍫🍫 आपणास खुप खुप उदंड आयुष्य लाभो. 💐 आनंदी, उत्साही, निरोगी व दिर्घायुष्यी राहा. खुश राहा. स्वस्थ रहा. मस्त राहा. सुरक्षित रहा हिच  मनोकामना व सदिच्छा. 💐💐💐💐💐💐💃💃💃💃💃💃💃
— सौ  मंदा शेटे. मुंबई.
9
देवेन्द्र जी, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
सेवानिवृत्ती नंतरची दुसरी पारी आपण ज्या वेगाने खेळत आहात त्याबद्दल अभिनंदन. शुभेच्छा…
— शरद चौधरी. निवृत्त माहिती संचालक, नागपूर

10
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर !🎊🥳🎂
— प्रियांका शिंदे जगताप. कॅनडा.
11
Best wishes on Birthday 👍💐🌺🌹.
— Chandrashekhar Oak. IAS ( Retd) Mumbai.
12
आज तुमचा वाढदिवस आहे. पत्रकार नंदकुमार परशुराम पाटील आणि स्वातंत्र्यसैनिक डॉ. परशुराम पाटील यांच्या ‘कलाश्रम’ या संस्थेच्या वतीने तुम्हाला वाढदिवसाच्या सुयश, शुभेच्छा! केवळ माहितीसाठी माझी आणि संस्थेची माहिती पाठवत आहे. असाच स्नेह राहू द्या !

13
आपणांस उदंड आयुष्य आणि ठणठणीत आरोग्य प्राप्त होवो या मनःपूर्वक शुभेच्छा
— योगेश वसंत त्रिवेदी. जेष्ठ पत्रकार, मुंबई.
14
Namaskar sir. We pray to the almighty to keep you happy healthy and fit for decades ahead. Happy birthday.
— BB Nayak. Sr Journalist, Navi Mumbai.
15
Happy birthday dear Devendraji .God bless you with joy and happiness 🎂🙏🏽🌸
— Dr Govind Gunthe.
Writer and Former Director,Doordarshan, New Delhi.

16
प्रिय देवेंद्र काका,
निवृत्तीनंतर सुद्धा आपण स्वतःला वेगवेगळ्या विषयावरच्या लिखाणकामात तसेच वाचनात व्यस्त ठेऊन आपल्या वाचक वर्गास काहीतरी नवीन विचार देण्याचे काम निरंतर करत आलात. आपला हा छंद अजून बहरत जाओ आणि आपल्या वाचक वर्गास नवीन काहीतरी विषय वाचनात मिळो ह्यासाठी पुन्हा एकदा आपले आभार आणि शुभेच्छा….

आपणास जाधव कुटुंबियांकडून वाढदिवसानिमित्त  हार्दिक शुभेच्छा !!
😃💐🙏🏻
— प्रतीक राजाराम जाधव. उलवे, नवी मुंबई.
17
डीजीआयपार परिवाराचे मार्गदर्शक, निवृत्त संचालक साहेब, अनुभवी व अभ्यासू नेतृत्व सन्माननीय भुजबळ साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !
साहेबांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, निरंतर यश आणि पुढील वाटचालीस भरभरून यश लाभो, ही ईश्वरचरणी मनःपूर्वक प्रार्थना.
— वाबळे. छत्रपती संभाजीनगर

18
गुरुविना ज्ञान नाही
ज्ञानाविना संस्कार नाही
गुरुविने मिळे ना ज्ञान
ज्ञानविन मिळे ना जगी सन्मान
जीवनरूपी भवसागर तराया
वंदन करते गुरूंना
गुरुशिवाय ज्ञान नसे
ज्ञानाविना आत्मा नसे
विद्या कर्म लक्ष्य आणि धैर्य
सर्व काही गुरुची देण आहे.
माझ्या आदरणीय गुरूंना वंदन आणि तुमच्या जन्मदिनानिमित्त सतत धार पर्ज्यनाच्या आणि हिरव्यागार निसर्गमय थंड गारव्यासह सुदृढ आरोग्याच्या आणि आनंदमय आभाळभर शुभेच्छा ! 🎂🍰🌹
— कवयित्री वर्षा भाबल. नवी मुंबई.
19
🌹🌹🌹🌹🌹🌹
देवेंद्र भुजबळ यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. नोकरीतून सन्मानाने निवृत्त झाल्यावर ; आधीपासूनच असलेली सवय त्यांनी सकारात्मक विचारांनी पुढे नेली. स्वतः आपल्या पत्नी समवेत पोर्टल सुरू करून त्या विषयातही भरघोस यश मिळवले. आपल्या मनातील सुप्त विचाराना योग्य मार्ग स्वीकारून अनेक पुरस्कार मिळवून आपले स्वतः चे एक अस्तित्वच निर्माण केले आणि दूरदर्शन मधील सर्वांचे प्रेम जपले ,वाढवले. म्हणून आजही त्यांची ओढ त्यांचे पोर्टल  विकसित करून , त्याच  बरोबर  अनेक पुस्तके प्रकाशित केली. खऱ्या अर्थाने ते भुजबळ आहेत म्हणजे Armstrong आहेत. विनोदाचा भाग सोडला तरी त्याची दखल समाजाने उत्तम घेतली आहे. वेळ असेल तेव्हा लगेच विचारणार, काय रे जयंता यायचय आहे तुला मस्त कार्यक्रम आहे. आम्ही अगदी जवळ असल्यामुळे अर्धा तासात भेट घडू शकते. तितकेच प्रोत्साहन त्यांना त्यांच्या धर्मपत्नी कडून ही मिळते. प्रपंच आणि परमार्थ कसा अचूक  साधायचा तर मी देवेंद्र भुजबळ यांचं नांव आवर्जुन घेईन. अशा या गुणी अखंड लक्ष्मी अलंकृत राजमान्य राजश्री सद्गुरू कृपावंत आणि माता पिता कृपावंत श्री. देवेंद्र माऊली यांना आजच्या मंगलदिनी वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा आणि अभिनंदन.. शुभं भवतू
— जयंत ओक. गप्पागोष्टी फेम 🌹🚩🌹🚩🌹🚩
20
सन्मित्र देवेंद्र…
तुमच्या अविरत कार्यरत भुजा म्हणजे आमचे ‘बळ’
(त्यात अर्थातच  त्यांच्या ‘अर्धांगिनी’ अलका हिचा सिंहीणीचा वाटा आहे) 🙏🐚🔔🤝🏻…🥂

21
श्रीमानजी,
आपको जन्मदिन की हार्दिक बधाई एवं मंगलमय शुभकामनाएँ 💐🎂

ईश्वर से प्रार्थना है की आपका जीवन सदैव उत्तम स्वास्थ्य, यश, सम्मान, समृद्धि और निरंतर सफलता से परिपूर्ण रहे। आपका प्रेरणादायी नेतृत्व समाज और राष्ट्र को सदैव नई दिशा और ऊर्जा प्रदान करता रहे।

रामचरितमानस का यह वचन जीवन में कर्तव्य और पुरुषार्थ का संदेश देता है— “राम काजु कीन्हे बिनु मोहि कहाँ विश्राम”
अर्थात धर्म, कर्तव्य और लोकमंगल के कार्यों में निरंतर समर्पित रहना ही श्रेष्ठ जीवन का मार्ग है।

इसी प्रकार श्रीमद्भगवद्गीता का यह दिव्य सिद्धांत हमें कर्मयोग का मार्ग दिखाता है— “कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।”
अर्थात मनुष्य का अधिकार केवल कर्म करने में है, फल की चिंता में नहीं.

प्रभु श्रीराम की मर्यादा और भगवान श्रीकृष्ण के गीता उपदेश की प्रेरणा आपके जीवन को सदैव आलोकित करती रहे तथा आप राष्ट्र और समाज की सेवा में निरंतर नई ऊँचाइयाँ प्राप्त करते रहें।
जन्मदिन की पुनः हार्दिक शुभकामनाएँ। 💐

— सादर, डॉ. वेदप्रकाश शर्मा. वरिष्ठ उपाध्यक्ष, अंतरराष्ट्रीय रामलीला समिति 🚩 नई दिल्ली, प्रदेश अध्यक्ष, जियो गीता 🚩 महाराष्ट्र (जुहू, मुंबई)

22) आदरणीय देवेंद्र भुजबळ सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🌸🌟
माध्यम विश्वाचा बुलंद आवाज, 
प्रशासनातही राखला ज्यांनी गाज.

ज्ञान, समृद्धीची अखंड ही वारी, 
महान व्यक्तिमत्त्व, कीर्ती न्यारी.

दूरदर्शनच्या पडद्यावरची ती चर्चा, 
‘महाचर्चा’ अन् ‘नमस्कार मंडळी’चा दर्जा.

‘डीजीआयपीआर’चे कुशल ते नेतृत्व, 
दर्जेदार पत्रकारितेचे जागवले सत्त्व.

‘न्यूज स्टोरी टुडे’ची डिजिटल क्रांती, 
‘आम्ही अधिकारी झालो’तून प्रेरणेची ज्योती.

आपल्या लेखणीला, कर्तृत्वाला मानाचा मुजरा, 
वाढदिवसाचा हा क्षण व्हावा सुखद अन् साजरा !

तुम्हाला दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो, हीच प्रार्थना!
— ✍️ कवी : गजाभाऊ
23
अतिशय कठीण परिस्थितीतूनही आयुष्य फुलवणाऱ्या आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
— नीला बर्वे. कवयित्री, लेखिका. सिंगापूर.
24
🌷🌷🎁🎁🌷🌷
आजच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला खूप खूप मंगलमय हार्दिक शुभेच्छा…!!! 🌹🌹🎂🎂🌹🌹
— शिवाजी  फुरसुंदर. निवृत्त उप महासंचालक. दूरदर्शन, मुंबई

— संकलन : देवेंद्र भुजबळ
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments