रसिक वाचक हो,
सादर नमस्कार.
“माझी जीवन नौका” या जहाजाच्या आमच्या जीवनावरील लेखमालेचे तेरा भाग आतापर्यंत प्रकाशित झाले आहेत. आपण सर्वांनी आतापर्यंतच्या भागांना उत्साहाने प्रतिसाद दिलात, माझ्या लिखाणावरती प्रेम केलंत, कौतुक केलंत. त्यामुळे मला लिहायची ऊर्जा सतत मिळत राहिली. याबद्दल तुम्हा सर्वांची मी अत्यंत ऋणी आहे.
माझ्या या लेखमालेचा १४ वा भाग आज प्रकाशित व्हायला हवा होता. परंतु माझ्या डाव्या डोळ्याचे मोतीबिंदूचे ऑपरेशन सोमवारी, २९ जून रोजी झाले आहे. त्यामुळे सध्या मला डॉक्टरांनी लिहायची व वाचायची बंदी केली आहे.
तसेच परवा उद्या मंगळवार, सात जुलै रोजी, माझ्या उजव्या डोळ्याचे ही मोतीबिंदू साठी ऑपरेशन व्हायचे आहे. त्यानंतर डोळ्यांची काळजी घेण्यासाठी निदान तीन आठवडे तरी मला लिहिता – वाचता येणार नाही. त्यामुळे लेखमालेत जो खंड पडणार आहे, त्याबद्दल माफी असावी.
त्यानंतर या लेखमालेचे पुढील भाग लिहिणे मी परत सुरू करेन. लेखमालेचे पुढचे भाग न्यूजस्टोरी पोर्टलवर पाठवायला सुरुवात झाली की तुम्हाला लगेच कळवेनच.
तुमच्यासाठी आत्ता पाठवते तशाच पुढील सर्व भागांच्या लिंक्स नियमित पाठवल्या जातील.
तुम्हा सर्वांचं प्रेम व आशीर्वाद असेच सदैव मिळत राहू देत ही सर्वांना नम्र विनंती.
शुभैषी,

— वेदवती मुकुंद कुलकर्णी. ☎️ 9869484800
