Homeलेखइंजिनीरिंग : कॉलेज निवडताना घ्यायची दक्षता

इंजिनीरिंग : कॉलेज निवडताना घ्यायची दक्षता

२०२६ सीईटी परीक्षेचा निकाल लवकरच येणार आहे. पालक आणि विद्यार्थी विचारात असतील की कोणते कॉलेज निवडायचे ?

सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी योग्य इंजिनीरिंग कॉलेज निवडताना  खालील महत्त्वपूर्ण बाबींचा विचार करायला हवा. म्हणतात ना ! ‘वेल बिगन इज हाफ डन’

१) प्रवेश कट ऑफ (किमान आणि कमाल सीईटी / जेईई स्कोर)
२) महाविद्यालयात राबविण्यात येणारी प्रभावी शिक्षण पद्धत.
३) महाविद्यालयातील वर्गहजेरीची सक्ती.
४) महाविद्यालयातील प्लेसमेंट्स (रोजगारसंधी आणि त्यासाठी महाविद्यालय देत असलेले रोजगाराभिमुख प्रशिक्षण)
५) महाविद्यालयाचे शिक्षणशुल्क आपल्या आवाक्यात आहे का ?

१) प्रवेश कट ऑफ (किमानआणि कमाल सीईटी/ जेईई स्कोर) दर वर्षी कट ऑफ आणि परसेन्टाईल मर्यादाकमी जास्त होतच असते. त्यानुसार गेल्या ३ वर्षाचा स्कोर पाहून एक अंदाज आपणांस काढता येतो अथवा शैक्षणिक सल्लागार यांचे कढून पण आपल्या उपलब्धी प्रमाणे घेऊ शकता. हा कट ऑफ मेरिट नुसार खाली वर असतो. 

२) कॉलेज अकॅडेमिकस (प्रभावी शिक्षण पद्धत) काही कॉलेजेस अकॅडेमिकसवर भर देतात. वर्गात शिक्षणावर भर असतो. तर काही कॉलेज हे ऑनलाईन शिक्षणावर भर देतात. आपल्या पाल्याला काय झेपेल या  नुसार भवतालच्या विद्यार्थ्यांकडून माहिती घेऊन हा निर्णय घेता येतो. आपला पाल्य चांगलाच हुशार असेल तर तो ऑनलाईन शिक्षणावर पण चांगले गुण मिळवू शकतो. तसे नसेल तर वर्ग शिक्षण असलेले कॉलेज निवडावे.

३) वर्गहजेरी ची सक्ती : काही कॉलेजेसमध्ये वर्गहजेरीची सक्ती असते, काहीमध्ये नसते, याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. या मुलेमुलामध्ये शिक्षणाची ओढ आणि आवड राहते व दर्जेदार शिक्षण मिळते. 

४) रोजगारसंधी : काही कॉलेजमध्ये प्लेसमेंट वर भर नसतो, काही कॉलेजेसमध्ये असतो. याचा सर्वे करूनच कॉलेजची निवड करावी. सर्व पालक प्रामुख्याने कॉलेज प्लेसमेंट्स मध्ये इंटरेस्टेड असतात. आज काल सर्व कॉलेजच्या संकेत स्थळावर ८०% प्लेसमेंट नमूद केलेले असते. त्याची खात्री जाणकारांकडून  करून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. प्रत्येक कॉलेज आपापले कौतुक सांगत असते.  

५) शिक्षणशुल्क : दर वर्षी प्रत्येक कॉलेज शिक्षण शुल्क काही प्रमाणात वाढवत असते. प्रामुख्याने पहिल्या वर्षीचे शुल्क हे पुढच्या चार वर्षासाठीचे ठरलेले असते. पालकांचे वार्षिक उत्पन्न आणि होणारा खर्च याची सांगड घालूनच निर्णय घ्यावा… 

पुढील अजून काही महत्वाच्या बाबींचा विचार  करावा….!! 

१) नियमित शासकीय विद्यापीठाला संलग्न कॉलेज म्हणजे काय ..?
२) अभिमत कॉलेज म्हणजे काय ..?
३) खाजगी अभिमत विद्यापीठ म्हणजे काय …? 

१) नियमित शासकीय विद्यापीठ संलग्न कॉलेजम् हणजे काय ..?
जे कॉलेज शासनाने शासित केलेल्या विद्यापीठाशी संलग्न आहे त्यातील अभ्यासक्रम हा त्या विद्यापीठाने निर्धारित केलेला असतो. शिक्षणशुल्क पण शासनाने निर्धारित केलेल्या निकषांनुसार असते. अश्या कॉलेज मध्ये अभ्यासक्रम बदलणे एवढे सोपे नसते (BATU, SPPU, BAMU, NU, Shivaji University, SRTMU ETC ). यांची गुण पत्रिका आणि पदवी सुद्धा याच विद्यापीठाची असते. पेपर सेटिंग, चेकिंग पण विद्यापीठच करते. यांच्यात कॉलेज सहभाग फक्त शिकवणे आणि परीक्षा घेणे या  पुरताच मर्यादित असतो … 

२) अभिमत कॉलेज म्हणजे काय ..?
अभिमत कॉलेज स्वतःच शैक्षणिक अभ्यासक्रम ठरवते आणि शासकीय विद्यापीठ त्याला मान्यता देते. वाढीव आणि कौशल्याधारित विषय ज्या मुळे रोजगारक्षमता वाढते असे विषय हे कॉलेज अभ्यासक्रमात लगेच आणू शकते. अशा विषयाला शासकीय विद्यापीठ मान्यता देते. यामुळे त्या कॉलेजचे प्लेसमेन्ट वाढते. पण शैक्षिणक शुल्क हे वाढलेले असू शकते. या कॉलेजचे पेपर कॉलेजच काढते. चेकिंग सुद्धा कॉलेजच करते. इथे गुण पत्रिका व पदवीपण विद्यापीठाचीच मिळते.

या कॉलेजला फी माफी विषयक सर्व कोटा (ओपन,ओबीसी, sc) हा शासन नियमाप्रमाणे निर्धारित असतो. ऍडमिशन सर्व शासन नियमाप्रमाणे होत असतात.   

३) खाजगी अभिमत विद्यापीठ म्हणजे काय …? 
आज काल शिक्षणाचा खर्चाचा बोजा शासनानं कमी करण्याच्या हेतूने- फी रिझर्व्हेशन, ऍडमिशन रेगुलेशन हे स्वयम निर्धारितअसतात. यात काही प्रमाणातच शासनाचा अंकुश असतो. अशा कॉलेजेस मध्ये शैक्षणिक अभ्यासक्रम कॉलेज ठरवते. या कॉलेज चे पेपर कॉलेजच काढते. चेकिंग सुद्धा कॉलेजच करते.

इथे गुण पत्रिका व पदवी पण खासगी विद्यापीठाचीच मिळते.

हि सगळी सिस्टिम सेल्फ रेग्युलेटेड असते. जो गुणवत्ता टिकवतो तोच टिकतो या सिद्धांतावर हे चालते.
योग्य कॉलेज निवडा, आपले भविष्य सुरक्षित करा !

www.dastoorkar.com
www.myacreerveda.com

wsp Details or Call on
९७६६६९१४५९

— लेखन : प्रा. प्रमोद दस्तूरकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments