Homeसाहित्यनिसर्ग : 2 कविता

निसर्ग : 2 कविता

1) “मी आणि निसर्ग”

मी आणि निसर्ग बसलो नदीच्या आल्याड पल्याड
काय तुझे हे सतत चे बदल म्हणून मीच त्याच्यावर बरसलो…..

एक उसासा घेत त्याने मला पाहिले….
गार ढगाचे एक सावट माझ्या माथी आले

का चिडतो इतका काही चुकले का माझे
निसर्गाने त्याला अगदी सहज पुसले ?..

बाप म्हणवतो स्वतःला तरी इतका निष्ठूर कसा
हरवून टाकलेस ऋतू सारे आणि इथे विसावला असा…

गंमत सऱ्या ऋतूंची नष्ट तुम्ही केली
वसंतातल्या माझ्या नवीन पालवीची
देणगी तुम्हीच तर झिडकारली….

ग्रीष्माला आणून मी सारे निसर्ग चक्र चालवतो
तुम्हालाच नाही तर बाकी साऱ्यांना पिळवटून टाकतो

अलगद साऱ्यांची कोरड मी वर्षा ऋतूने भागवतो
ग्रीष्म आणून मी पुढच्या पिढीची तयारी करतो

बाप आहे म्हणून पुढचा विचार करतो
शारदा मध्ये भेट साऱ्यांना मी निरभ्र आकाशाची करतो

गळालेली पाने मी सोबत घेऊन जातो …
हेमंताची गरिमा काही और च आहे
गुलाबी थंडीचे पांघरूण सऱ्या निसर्गावर आहे …

शिशिरा मध्ये मी खुंटवून टाकतो सारे
आराम हवा थोडा म्हणून स्वतःलाच गोठवतो हे मात्र खरे…

कोण म्हणतं मी केले बदल ….
बाप आहे ना म्हणून घडवतो आहे अद्दल…

2) “अवकाळी पाऊस…”

ढग आज आकाशात पुन्हा दाटून आले
विजांच्या कडाडण्याने घरांचे कोपरे शहारले

तो आला नाही घरी म्हणून तांब्या तिने उलटा मांडला
वेळ जशी पुढे जात होती धीर तिचा सांडला……

किती रागे भरू तुला कुंपणात असा का नाचतोस
लावलेली दारी सायलीची वेल का उध्वस्त करतोस..

नको ना येऊ अवेळी साडी चोळीही नाही पुरेशी
परिस्थिती नाही बरी फार पण धीर आहे उराशी …..

अमान्य नाही मला तुझे हे येणे
कसे तुला समजावू हे फुलंच आहे माझे लेणे…….

नको ना येऊ पुन्हा पुन्हा इतक्या जोरात
काळजी वाढते रायाची माझ्या उरात

नाहीत माझ्या घराची कौलं इतकी बळकट
एकच आहे आमच्या दोघात एक वळकट

अशी अप्राप्य संधी आहे आपल्या साऱ्यांची
त्यात भर आहे या बेधुंद वाऱ्याची

मी पुन्हा पुन्हा सांगते नको ना येऊ अशा अवकाळी
तुझ्या बरसण्याने कोमेजली आहे माझी बकुळी

नको ना येऊ अशा अवेळी………….

सायली विघ्नेश शेंडे.

— रचना : सायली शेंडे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments