Homeसाहित्यकोणी तरी असावे....

कोणी तरी असावे….

कशी आहेस विचारणारे
तू काळजी करू नको
मी आहे ना, म्हणणारे
कोणी तरी असावे असे…

निरपेक्ष नाते जपणारे
समजून सांगणारे
आपले ऐकुन घेणारे
कोणी तरी असावे असे…

हे तुला जमणारच
तू हे नक्की करू शकते
ठामपणे पाठीशी असणारे
कोणी तरी असावे असे

आनंद साजरा करणारे
दुःख वाटून घेणारे
कायम सोबत करणारे
कोणी तरी असावे असे

चुकीच्या वाटेत सावरणारे
योग्य दिशा दाखवणारे
आयुष्य सुंदर करणारे
कोणी तरी असावे असे

हास्यामागील अश्रू पुसणारे
अबोल्यातील शब्द वाचणारे
भावनांना स्पर्श करणारे
कोणी तरी असावे असे

कधीही जज न करणारे
गुण दोषांसहित स्वीकारणारे
जगण्याला जीवंत करणारे
कोणी तरी असावे असे.

एक नवे जग दाखवणारे
कल्पना शक्तीचा ठाव घेणारे
जीवनाला उभारी देणारे
कोणी तरी असावे असे

तुला हे कसे जमते
तुसी ग्रेट हो म्हणणारे
सुप्त गुणांना वाव देणारे
कोणी तरी असावे असे

मनाचा गाभारा जपणारे
शिंपल्यातील मोती जसे
एक अनामिक अनमोल
कल्पनेतील नाते जसे….

असावे कोणी तरी असे
असावे कोणी तरी असे
बहीण, मुलगी, मैत्रीण
अशी हवी ती घट्ट वीण.

रश्मी हेडे

— रचना : रश्मी हेडे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments