Homeसाहित्यपुस्तक परिचय

पुस्तक परिचय

वित्तीय व्यवस्थापनवरील इंग्रजी पुस्तक

वैयक्तिक पैशाचे व्यवस्थापन कशा प्रकारे करावे, याबद्दल “Educated Illiterates (Personal Finance Management Your Money, Your Future)” ह्या पुस्तकात योग्य प्रकारे मार्गदर्शन करण्यात आले आहे. या पुस्तकाचे लेखक श्री नितीन श्रीवास्तव यांना आर्थिक व्यवस्थापन, गुंतवणूक क्षेत्रात दीर्घ अनुभव आहे.

लेखक नितीन श्रीवास्तव

आपल्या मिळकतीचे आपण योग्य प्रकारे व्यवस्थापन केल्यास आपलाच वर्तमान आणि भविष्यकाळ सुखावह होईल. हे शहाणपण तुमच्याकडे नसेल तर तुम्ही शिक्षित असाल तरी त्या दृष्टिने अज्ञानीच आहात, हा मोलाचा संदेश ह्या पुस्तकात लेखकाने दिला आहे. तुमची मिळकत आणि दैनंदिन होणारा खर्च यांचा ताळमेळ घालणे जरूरी असते. रोजच्या आवश्यक गरजांवर खर्च करताना देखील उधळपट्टी होणार नाही हे पाहावे. ह्या बाबींवर पैसा खर्च होताना झालेली बचत गुंतवून खर्चीत पैसा पुन:प्राप्त करण्यासाठी बँकेत नियत कालावधीची गुंतवणूक, रोखे किंवा स्थावर मालमत्तेत गुंतवणूक इ. मार्ग सुचविले आहेत. ह्यातून मिळणारा पैसा भविष्यातील आजार, मुलांचे शिक्षण, लग्न इत्यादींसाठी उपयोगी ठरतो.

लेखकाने खर्चाचे नियोजन, विमा, आयकर, निवृत्त झाल्यावर कमी होणारे उत्पन्न भरून काढणे इ. वरही प्रकाश टाकला आहे. आयकरातून जास्तीत जास्त सुट कशी मिळविता येईल यावरही मार्गदर्शन केले आहे. तसेच SIP (Systematic Investment Plan), IRR (Internal Rate of Return) अशा अनेक वित्तीय संकल्पनांशी वाचकाला अवगत केले.

या पुस्तकाबद्दल बोलताना अमरावती येथील जी.एच. रायसोनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विनायक श्रीधर देशपांडे म्हणतात, “या पुस्तकाचे शीर्षक वाचूनच वाचक आकृष्ट होऊन त्यांची उत्सुकता वाढीस लागेल असा विश्वास वाटतो. ‘आर्थिक संकल्पनाचे सखोल ज्ञान असणे हे आर्थिक निर्णय घेण्यासाठी आवश्यक आहे’, असा संदेश लेखकाने दिला आहे. आपल्या सर्वांना हवे असलेले आर्थिक स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आर्थिक साक्षरता महत्त्वाची आहे. ह्याकरिता प्रियजनांसह कोणावरही अवलंबून राहिल्यास अनेक अडचणींशी सामना करावा लागू शकतो.

कुलगुरू डॉ विनायक देशपांडे

लेखकाने व्यावहारिक उदाहरणांव्दारे उत्तम गुंतवणूक कशी करावी आणि सेवानिवृत्तीसाठी प्रभावीपणे बचत कशी करावी, हे दाखवून दिले आहे. आर्थिक साक्षरता आपल्या तसेच अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी देखील आवश्यक आहे. हा महत्त्वाचा संदेश लेखकाने ह्या पुस्तकात दिला आहे.”

लेखकाने तुमच्यात असणारी वित्तीय साक्षरतेची उणीव दूर करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हे पुस्तक डिजीटल स्वरूपातही उपलब्ध असून पुस्तकाची हिंदी आवृत्ती लवकरच उपलब्ध होत आहे.

रणजीत चंदेल

— परीक्षण : रणजित चंदेल. निवृत्त माहिती अधिकारी. यवतमाळ.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️98694 84800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments