Homeसाहित्यआजची पिढी…

आजची पिढी…

कशी आहे आजची पिढी,
यांना धीर धरवत नाही,
सगळे हवे काही क्षणात,
यांना सतत कशाची घाई ?

एकटेच असतात,
यांना सोबत कुणी नको,
यांना त्यांची स्पेस हवी,
कुठली जबाबदारी का नको ?

सारे निर्णय पटकन घेती,
विचार फार ना करती,
ना यांची कोणतीच धोरणे,
ना कुणावर ना प्रीती ?

कितीदा चुकती,
तरीही गंभीर विचार तो येईना,
चिडचिड करती, मनात रडती,
भीती कुरतडते यांना

सल्ला कुणाचा नकोच असतो,
भ्रम, सारे कळते यांना,
डिप्रेशनचा टेंभा मिरवती,
चिंता जन्मदात्यांना,

वाचन नाही, चिंतन नाही,
फक्त मस्त जगावे,
कधी होतील शहाणे,
धुंदी ही कधी उतरेल म्हणावे,

अशीच आहे तरुणाई,
ना आहे कसली चिंता,
हेच असे का भाग्य उद्याचे,
कसे तुझे होईल जगा ?

हेमंत भिडे

— रचना : हेमंत भिडे. जळगाव
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments