चिऊताई किती छान छान,
लवकर उठून गाते गान।
टुणटुण उड्या मारतेस,
पटकन दाणा टिपतेस।
भुर्रकन उडून जातेस,
पिलांना खाऊ देतेस ।
छोटेसे अंग डौलदार,
चोच तुझी टोकदार ।
दिसते किती छोटुली छान,
छोटी मैत्रीण बाळाची छान ॥
— रचना : रेखा दीक्षित. कोल्हापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
