Homeबातम्या"हिंदू संघटन : काळाची गरज" - शंकर संगपाळ

“हिंदू संघटन : काळाची गरज” – शंकर संगपाळ

देशात हिंदू धर्म आणि संस्कृती टिकवायची असेल तर हिंदूंनी संघटित होणे ही काळाची गरज आहे. हिंदू संघटित नसल्याने लव जिहाद, लँड जिहाद, कॉर्पोरेट जिहाद आणि अन्य अनेक हिंदूविरोधी घटना सतत घडत आहेत. हिंदू धर्म पाडण्याचं काम प्रस्थापित मंडळी करीत आहेत. त्यामुळे आता आपण हिंदू धर्माच्या रक्षणासाठी जागृत राहिले पाहिजे, असे परखड विचार बजरंग दल नवी मुंबई जिल्हा संयोजक श्री. शंकर संगपाल यांनी मांडले. समर्थ हिंदू संमेलन समितीच्या वतीने सानपाडा सेक्टर ७ व ८ च्या वतीने गाडगे महाराज मैदानात नुकतेच विराट हिंदू संमेलन भरले होते. या संमेलनात “हिंदू समाज जागरण व संघटन – काळाची गरज” या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून श्री शंकर संगपाळ बोलत होते.

आपल्या जोशपूर्ण भाषणात श्री शंकर संगपाळ पुढे म्हणाले की, एखादा धर्म एखाद्या देशात टिकवायचा असेल तर जन्मदर दोन असला पाहिजे. तो जर नसेल तर इतर देशातील धर्माप्रमाणे आपल्या देशात हिंदू धर्मावर त्याचा परिणाम होऊ शकतो. १९९२ ला अखंड देशातला हिंदू एकत्र झाला. त्यामुळे त्यावेळी बाबरी मस्जिद तोडण्याची ताकद सुद्धा हिंदू बांधवांमध्ये आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल किंवा या व्यतिरिक्त हिंदू संघटना, कित्येक अध्यात्मिक मंडळी आहेत, धार्मिक संस्था आहेत. या सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी हा विचार केला पाहिजे. सानपाड्यातील ओरिएंटल कॉलेजचा विषय असो किंवा मस्जिदचा आरक्षण प्लॉट असो. या विरोधात सानपाड्यातील नागरिकांनी चांगला आवाज उठविला आहे. प्लॉटच्या आरक्षणाविरोधात तर चांगलाच लढा दिला आहे. देशातील हिंदू जागृत होत आहे, हे एक चांगलं पाऊल आहे, असे मला वाटते.

विवेकानंद केंद्र नवी मुंबईच्या संयोजिका डॉक्टर सौ. वंदना महाजनी यांनी कुटुंब, भोजन, भूषा, भ्रमण, भजन या पंचपरिवर्तनाबाबत अतिशय मौलिक मार्गदर्शन केले.

निसर्गप्रेमी, अखिल सानपाडा महासंघाचे श्री अजय पवार यांनी मस्जिद आरक्षणाविरुद्ध सानपाडा नागरिकांनी एकजुटीने दिलेला लढा, ओरिएंटल कॉलेज परिसरातील गंभीर प्रश्न, सानपाड्यातील पाण्याची समस्या इत्यादी स्थानिक प्रश्न अतिशय आक्रमकपणे मांडले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानचा वध केला, यावर आधारित सुंदर नाटिका सादर करण्यात आली.

सुरुवातीला भारत मातेचे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून वक्त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.

सूत्रसंचालन श्री.अरुण अहिरे यांनी तर आभार प्रदर्शन समितीचे कार्याध्यक्ष व समाजसेवक पांडुरंग आमले यांनी केले.

याप्रसंगी नगरसेवक भाऊ भापकर, सुनिल कुरकुटे, नगरसेविका शैला पाटील, सानपाडा भाजपचे नेते श्री. राय, महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त माहिती संचालक श्री. देवेंद्र भुजबळ, सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारुती विश्वासराव समाजसेवक राजेश ठाकूर, अजित सावंत आदी मान्यवर आणि परिसरातील बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली. सर्वांना प्रसादाचे वितरण करण्यात आले.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments