वाचकांना आवाहन
नवनवीन विषय, कल्पना, विचार आपल्या पुढे मांडण्याचा न्यूजस्टोरीटुडे चा नेहमीच प्रयत्न असतो. अशा प्रयत्नांना आपणही सकारात्मक प्रतिसाद देत असता.
या दृष्टीने सर्व वाचकांना आवाहन करण्यात येते की, नवीन वर्षात त्यांना कोणत्या विषयांवर वाचायला आवडेल, कुठल्या विषयांवर सदरं असावीत, ती कुणाची असावीत या विषयीच्या आपल्या सूचना, कल्पना, मतं 3 जानेवारी 2022 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत, 9869484800 व्हाट्सएप क्रमांकावर अवश्य कळवाव्यात. धन्यवाद
आपली
– टीम एनएसटी
दि.30.12.2021 च्या न्यूज मधे आलेली “त्या वळणावर” ही साधना आठल्ये यांची अतिशय सुंदर, तरल कविता वाचायला मिळाली. एका वळणावर अचानक जोडीदार सोडून गेल्यावर व्यथित झालेले जोडीदार, त्याचा भास आणि नंतर प्रेमाच्या मधुर अशा स्मृतीनी मनाला दिलेला दिलासा असं छान वळण घेत ..’पुन्हा क्षणोक्षणी आजही मला तव आठवणींचा काहूर त्रस्त करी’ असं म्हणत पुन्हा आठवणीच्या त्या वळणावर अलगद घेऊन जाणारी प्रेम..विरह..प्रेम अशी ही कविता खूपच भावस्पर्शी वाटली आणि मनाला भावली अगदी. नववर्षात ही त्यांच्या कडून खूपच अपेक्षा. आणि कवितेला अत्यंत साजेसं असं वेब पोर्टल. अप्रतिम. अलकाताई तुमचं अर्थपूर्ण वेब पोर्टल नेहमीच असते. आपल्या न्यूज स्टोरी टूडे मधून विविध विषयांवरची माहिती, मुलाखती, कविता वगैरे साहित्य म्हणजे खास मेजवानीच. ह्याचा लाभही नववर्षात मिळो व तुमच्या न्यूज स्टोरी टूडे भरभरून यश, प्रसिद्धी मिळो हीच सदिच्छा !!! अलकाताई तुम्हा दोघांचं खूप खूप अभिनंदन !!!
– नीता देशपांडे.
श्री किरण सोनार यांनी लिहिलेल्या महिला अधिकाऱ्यांची संघर्ष गाथा या पुस्तकाचा अनुवाद सौ प्रतिभा सोनार यांनी इंग्रजीत केला द स्ट्रगल सागा ऑफ वूमन ऑफिसर्स हे पुस्तक जागतिक पातळी वर पोहोचणार आहे.ग्रेट अभिनंदन 💐
अष्टपैलू आणि हरहुन्नरी निशिकांत धुमाळ यांच्या आयुष्याचा आलेख त्यांचे कार्य अतिशय छान मांडले आहे. धन्यवाद रश्मी हेडे🙏🏻
अन् बरच काही पुस्तकाचे प्रकाशन सोबत बरच काही देऊन गेले वा खूप छान.
हर्षदा राणे दीदी नी लिहिलेली आठवणी कविता छान👍
वाचक लिहितात सदरातील वाचकांचे अभिप्राय मस्तच मी लिहिलेले अभिप्राय पण खूप छान वाटले वाचायला धन्यवाद भुजबळ साहेब आणि प्रिय मैत्रीण अलका भुजबळ🙏🏻
शिक्षण महर्षी आणि भारताचे पाहिले कृषी मंत्री संपूर्ण महाराष्ट्राचे भाग्य विधाता आदरणीय डॉ पंजाबराव देशमुख यांच्या जयंतनिमित्त लिहिलेलं लेख छान खूप छान माहिती मिळाली आपल्या बैल गाडीतून जाणाऱ्या मित्राला भेटण्यासाठी ते गाडीतून उतरले. खरंच त्यांच्या व्यक्तिमत्वाचा पैलू समजला धन्यवाद कोठाळे साहेब.
मनीषा पाटील यांचा केरळ खाद्य संस्कृती वरील लेख सुंदर आहे खूप छान माहिती मिळाली मागे मनीषा ताईंचा केरळ वाद्यां संबंधीचा लेख ही छान होता धन्यवाद मनीषा ताई🙏🏻
हर्षदा ताईंचा आपण काय करू शकतो लेख उत्तम👌🏻
शफीक शेख यांची शोध कविता छान👍
5 वे पर्यावरण समारोप समारंभ पार पडला त्यात माननीय पद्मभूषण डॉ.अण्णा हजारे पद्मश्री राही बाई तसेच अनेक मान्यवरांचा सहभाग होता.
लेखिका सुलभा गुप्ते यांचा लेख विशेष त्यांना असलेली मयभुमिची ओढ प्रकर्षाने जाणवते. ऑस्ट्रेलिया तील मोगरा जास्वंद गुलाब चाफा कमळ ही फुलं त्यांना सरळ भारत भू वर घेऊन गेली त्यांनी मनानेच ती देवतांना वाहिली. आणि त्या हरवून गेल्या किती हे मातृभूमी वरील प्रेम🙏🏻
डॉ सोमनाथ मुटकुळे यांनी श्री हिरालाल पगडाल सरांनी लिहिलेल्या पुस्तका चे केलेले परीक्षण छान.
प्रा. विसुभाऊ बापट यांचा आदिवासींच्या होणाऱ्या फसवणुकीचा लेख मनाला चटका देऊन गेला
शिल्पा कुलकर्णी यांची 2021 ने काय शिकवले ही कविता खूप सुंदर.
– सुप्रिया सावंत
नवं वर्षाच्या शुभेच्छा
Ditto
– सुभाष
लीनाताई, नववर्षाच्या शुभेच्छा अतिशय सुंदर शब्दात गुंघल्या आहेत तुम्ही, अभिनंदन आणि तुम्हालाही नवीन वर्ष आनंदाचे जावो , सुखसमृद्धी चे जावो.
– सुनंदा पानसे
कवीवर्य मंगेश पाडगांवकर
अतिशय सुंदर अभ्यासपूर्ण लेख…
कवीवर्य मंगेश पाडगांवकरांच्या स्मृतीस सादर प्रणाम !!
– राधिका भांडारकर
खूप सुंदर लेख. छान आढावा घेतला. हीच खरी आदरांजली.
– अजय बिरारी
वाह्, डाॅ. गौरी, नेहमीप्रमाणे खुप खुप सुंदर. कित्येक वाक्य मनाला भिडली. तुमची कविता पण सार्थ अशी आहे. 👌👌👌
– लीना फाटक. यु.के.
ऐंशिव्या वर्षी स्फुरलं “साहित्य शिल्प
थोडेफार लिहिणाऱ्या सर्व “लेखूकूंना” प्रेरणा देणारा लेख. धन्यवाद.
मालेगावचा किल्ला
खुप छान सविस्तर वर्णन केलय समिना शेख यांनी. किल्ल्याची आताची अवस्था वाचून वाईट वाटले. महाराष्ट्र सरकार यांत लक्ष घालेल व योग्य ती दुरूस्ति करून किल्ला परत दिमाखात उभा राहिल अशी आशा करते
– लीना फाटक, यु.के.
जीवन प्रवास – भाग – १८
प्रियाचा किस्सा वाचून अंगावर शहारा आला..
अंधश्रद्धेचा भाग सोडला तर असे अनुभव जीवनात येतात.
मृत्युनंतर अस्तित्व आहे का हा संशोधनात्मक विषय आहे..
– राधिका भांडारकर
रहस्यमय (प्रिया चे जाऊन येणे, परत जाणे).
वडाळा विभागात तुमची आठवण सर्वजण काढतात, अगदी कौतुकाने आम्ही सांगतो आमचे सर आणि मॅडम आहेत ते…माझे सर येऊन जरी गेले तरी वडाळ्यात, तरी मित्र आवर्जून सांगतात की तुझे सर दिसले होते. आमच्या सर्व विद्यार्थ्यांचे खरोखर अहोभाग्य की आम्ही तुमच्याकडून घडलो गेलो, अजूनही तुमच्याकडून आम्हांला मार्गदर्शन तर मिळतेच, पण तुमच्या सहवासातून मायेची ऊब अजूनही प्रकर्षाने जाणवते. तुम्ही वडाळ्यात नसलात तरी आमच्या हृदयात मात्र कायमचे वसले आहात… आमचे…माझे सर आणि मॅडम
– संतोष जानू म्हात्रे
अचूक विश्लेषण
– प्रकाश गायकवाड, अमोल साळुंखे, विकी शिंदे, तेजस पाटील
वेश्या मातांची बालरक्षिका
डाॅ, राणी खेडीकर फार मोठ्ठ समाजकार्य करत आहेत. त्यांना यांत भरघोस येवो. त्याची ओळख करून दिली, विलास कुलकर्णीना धन्यवाद
आठवणी
आठवणी स्वप्नवत असतात. छान कविता.
२०२१ नं काय शिकवलं
वास्तवता, चपखल शब्द न सकारात्मक विचारांचा सुरेख संगम. 👌👌👌
मायभूमीची ओढ
अगदी खर आहे सुलभाताई. मी पूर्णपणे समजू शकते. ५० हून अधिक वर्ष यु.के. त राहूनहि भारताची “ओढ” आहेच. आॅस्ट्रेलियाचे सुरेख वर्णन केले आहे. फुलांच्या रूपात तुम्हाला तिथे मायदेश भेटला. खुप छान वाटले.
– लीना फाटक. यु.के.
कृषि क्रांतीचे शिल्पकार : डॉ.पंजाबराव देशमुख
डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी लिहीलेल्या माननीय कृषीमंत्री पंजाबराव देशमुख यांच्या आठवणी वाचनीय..
कृषी क्षेत्रातलं त्यांचं कार्य तसेच शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे केलेलं
शिक्षणक्षेत्रातलं कार्य महान आहे !!
कुटुंब रंगलंय काव्यात : भाग : ९
कार्यक्रमाच्या निमीत्ताने बापट यांना आदीवासींची होणारी लूटमार पहायला मिळाली.संवेदनशील मनाने त्यांनी लिहीलेले हे अनुभव खरोखरच उदास करणारे आहेत.
– राधिका भांडारकर
अष्टपैलू निशिकांत धुमाळ
Nishikant bhau tumhi kharach asthpailu ahatch itkya sankatana tond deun ithprnt pohochn kharch awghd hot pn tari tumhi tyavr mat Keli tumhi yash milvale tumchi ajun khup pragti howo parmeshwar tumchya ajun aslelya ichha purn karo
– Bharti Andhare Satana Nashik
Realy great nishikant .apli story yuvkana prernadai v adarah vat ahe. jivnat alelya pratek sanktacha samana karaycha asto har manaychi naste he tumhi siddh kele ahe. Ani sucess dekhil zale ahat. sarv kasar samajla apla abhiman ahe .
Apli ashich pragati vavhi hi prarthna
– Adv Vaishali Dode
वा वा निशीकांत तु माणुस म्हणुन व आमचा भाऊ म्हणून अगदी प्रेमळ व माणुसकी जपणारा आहेस च पण तुझ्या तील हे छान अष्टपैलू गुण बघून खुप खुप छान वाटले. तु आमचा भाऊ आहे यांचा जर जास्तच अभिमान वाटला. खुप यशस्वी हो 👍
NewsStoryToday नेहमी प्रमाणे उत्तम लेख खुप छान 👍
– मंदा शेटे
निशिकांत धुमाळ ह्यांचा जीवन प्रवास थक्क करून सोडणारा आहे. त्यांचे कष्ट त्यांची जिद्द सारेच प्रेरणादायी आहे, आणि म्हणूनच आज त्यानी यशाचे शिखर गाठले आहे. खूप शुभेच्छा..
कोजागिरीचा नवा प्रकाश !
कोजागिरी चा नवा प्रकाश हे शीर्षक फारच आवडल. मुलाखतीला साजेस आहे. सुजाता अंध असूनही तिने दाखवलेली धडाडी कौतुकास्पद आहे. सर्वांनी तिला केलेल्या सहकार्यामुळे आज ती यशस्वी झाली, बँकेत उत्तम रीतीने काम करू शकते आहे. हाती घ्याल ते तडीस न्याल हे सिद्ध करून दाखवल. अलकानी घेतलेली मुलाखत अतिशय आवडली
– सुनंदा पानसे