भारत सरकार नोंदणीकृत माणुसकी सोशल फौंडेशनच्या वतीने देण्यात येणाऱ्या “राज्यस्तरीय माणूसकी सेवा गौरव पुरस्कार” देवेंद्र भुजबळ यांना जाहीर झाला आहे.
समाजाप्रती दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात येत असल्याचे निवड समितीने पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री छगन भुजबळ व विधानसभा उपाध्यक्ष श्री नरहरी झिरवळ यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक येथे २६ फेब्रुवारी रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
अल्प परिचय
श्री देवेंद्र भुजबळ हे सध्या www.marathi.newsstorytoday.com
या आंतरराष्ट्रीय वेबपोर्टलचे संपादक आहेत.
पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्र विभागात बी सी जे करताना प्रा.ल ना गोखले पाठ्यवृत्तीचे ते सर्व प्रथम मानकरी ठरले. तर मराठवाडा विद्यापीठाच्या एम एम सी जे अभ्यासक्रमात ते प्रथम श्रेणीत सर्व प्रथम आले आहेत.
श्री भुजबळ पत्रकार, भारत सरकारच्या मुंबई दूरदर्शनमध्ये निर्माता, महाराष्ट्र शासनाच्या माहिती खात्यात अधिकारी होते. माहिती संचालक म्हणून ते २०१८ साली निवृत्त झाले.
दूरदर्शनच्या गाजलेल्या “महाचर्चा” कार्यक्रमाच्या २०० भागांसाठी ते ४ वर्षे रिसर्च अँड रिसोर्स पर्सन तर आकाशवाणी वरील महाराष्ट्र शासनाच्या “दिलखुलास” कार्यक्रमाच्या पहिल्या ५०० भागांचे टीमलीडर होते.
महाराष्ट्र शासनाच्या महान्यूज वेबपोर्टलसाठी “करिअर नामा” हे सदर त्यांनी सुरू केले. या सदरासाठी ते स्वतः नियमित लेखन करीत. हे लेख विविध वृत्तपत्रातूनही प्रसिद्ध झाले आहेत.
विविध क्षेत्रातील व्यक्तीं वर लिहिलेले “भावलेली व्यक्तिमत्वे”,
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अलौकीक पत्रकारिता पैलूवर लिहिलेले,
“स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाजवल्य पत्रकारिता”
(मराठी व इंग्रजी),
थोर व्यक्तींच्या जीवन कार्यावर लिहिलेले “अभिमानाची लेणी” हे ई -पुस्तक,
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशस्वी झालेल्या महिलांच्या प्रेरणादायी कथा असलेले “गगनभरारी”,
युवा आणि पुरुषांच्या प्रेरणादायी कथा असलेले
“प्रेरणेचे प्रवासी” कासार समाजातील ३५ व्यक्तींच्या यशकथा असलेले “समाजभूषण”
शेकडो सरकारी अभ्यासक्रम, प्रशिक्षण यांची माहिती असलेले “करिअरच्या नव्या दिशा” ही त्यांची पुस्तके लोकप्रिय ठरली आहेत.
ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे झालेल्या चौथ्या विश्व सावरकर साहित्य संमेलनात त्यांचे
“स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाजवल्य पत्रकारिता” या विषयावर झालेले व्याख्यान विशेष गाजले.
मलेशियातील चौथ्या विश्व शब्द साहित्य संमेलनाचे ते उद्घाटक होते.
“भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरक पत्रकारिता” हा त्यांचा संशोधन पर लेख मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, ऊर्दू भाषेतही प्रसिद्ध झाला आहे. विविध विषयांवर ते सातत्याने लिहीत असतात.
कोरोनाच्या काळात लोकांचे मनोधैर्य कायम राहण्यासाठी, वाढण्यासाठी ते विविध माध्यमातून प्रयत्न करीत आहेत.
श्री भुजबळ यांना आतापर्यंत विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
श्री भुजबळ व सौ अलका भुजबळ यांची “चौथा स्तंभ”चे मुख्य संपादक डॉ अनिल फळे यांनी नुकत्याच घेतलेल्या मुलाखतीची लिंक पुढे देत आहे.
https://youtube.com/c/ApratimMedia
अत्यन्त प्रेरणादायी अशी ही मुलाखत आपण अवश्य पहा व इतरांना ही पाहण्यासाठी अवश्य पाठवा.

– लेखन : मदन लाठी. 9869484800.
आदरणीय देवेंद्रजी भुजबळ साहेब,
सस्नेह नमस्कार.
आपणास राज्यस्तरीय माणूसही सेवा गौरव पुरस्कार प्राप्त झाला,हे ऐकून मनस्वी खूप आनंद झाला आपले मनापासून खूप खूप अभिनंदन !
आपल्या महान कार्यामुळे आपणास राज्यशासनाकडून मिळालेली पावती आहे.हा पुरस्कार समाजात भूषणावह नि अभिमास्पद आहे.
आपण पुरोगामी विचारवंत आहात.
आपल्या कार्य भान राखून बेभान होणारे आहे.
आपल्या कार्याचा आम्हास अभिमान तर आहेच,
त्याहीपेक्षा ते कार्य अधिक …
दिशादर्शक, मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहे.
देवघरात लावलेल्या नंदादीपाप्रमाणे आपल्या कार्याची ज्योत
जगतात सतत तेवत राहो प्रकाशमान होवो !
ह्या कार्यामध्ये सिंहाचा वाटा आपल्या सौभाग्यवती अलकाताईंचा हे विसरून चालणार नाही, त्यामुळे सौ.अलकाताईंचेही मनःपूर्वक अभिनंदन !
आपले आदर्श समाज कार्य अखंड चालू राहो,त्यासाठी आपणास व कुटुंबियांस आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभावे,
हीच श्री कृष्णकांत सासवडे सर आणि परिवाराकडून श्रीकालिका मातेचरणी प्रार्थना !
शुभेच्छुकः-
श्री कृष्णकांत सासवडे सर चिंचवड
आणि
श्री अमोल सासवडे आणि परिवार
चासकमान
भुजबळ साहेब,
मनःपूर्वक अभिनंदन
सर आपण उभयता करता आहात त्या सेवाभावी कार्या बद्दल योग्य वेळी मिळणारा पुरस्कार.अभिनंदन.
माननीय देवेंद्रजी, आपल्याला माणुसकी गौरव पुरस्कार मिळाल्याचे वाचून खुप खुप आनंद झाला. श्री. मदन लाठे यांनी आपल्या कार्याचा, कारकिर्दीचा लिहिलेला फार सुंदर आढावा वाचून आपल्याबद्दलचा आदर द्विगुणित झाला. उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या व माणुसकी जपणाऱ्या आपल्या सारख्या योग्य व्यक्तिला हा पुरस्कार मिळायला हवाच याबद्दल शंकाच नाही. असेच उत्तरोत्तर अगणित पुरस्कार आपल्याला लाभोत ह्या सदिच्छां. आपले कार्य असेच अखंड सुरू राहो ह्या शुभेच्छां. आपल्या कार्यात अलकाताईंचा पण बहुमोल सहभाग नक्कीच आहे. आपणा उभयतांना निरामय जिवन लाभो व आपण दोघांनी लावलेली समाजसेवेची ज्योत अखंड तेवत राहो. मनापासून हार्दिक अभिनंदन.
👏👏💐💐💐💐👏💐
नमस्कार, श्री देवेंद्र भुजबळ ह्यांचे हार्दिक अभिनंदन. आपल्या कार्याची आपणांस ही राज्यस्तरीय पावती मिळाली आहे.
असेच आपले कार्य चालू ठेवावे व सर्वांना प्रोत्साहित करत रहावे. आपल्या वेबपोर्टलमुळे खूप काही माहिती मिळते, तसेच स्वत:चे काही अनुभव लिहिण्याची स्फुर्ती मिळते.
॥ यशस्वी भव ॥ 🙏💐🙏
नमस्कार, मंडळी.
खरोखरच आपल्या शुभ कामनांमुळे मी भारावून गेलो आहे.
अर्थात या मुळे माझा अधिक काम करण्याचा हुरूप वाढेल.
आपल्या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद💐
भुजबळ सर यांना मिळालेला सन्मान उचित आहे! त्यांचे मनापासून अभिनंदन⚘⚘
देवेंद्र भुजबळ सरांना राज्यस्तरीय माणुसकी सेवा गौरव पुरस्कार मिळाला,हे वाचून खूप आनंद झाला. प्रेरणादायी व्यक्तिमत्व व मेहनतीने भरलेला करियर ग्राफ, म्हणजे सरांचा अखंड वाहता झरा आहे.
खूप खूप अभिनंदन ॥ सर ,
सौ.वर्षा महेंद्र भाबल.
मा. देवेंद्रजी भुजबळ साहेब आपण विविध सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन आपणास माणुसकी सेवा गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल आपले व सौ अलका भुजबळ मॅडम दोघांचेही हार्दिक अभिनंदन. आपणास. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🌹
खूप अभिनंदन
खूप खूप अभिनंदन आम्हाला तुमचा अभिमान आहे
*प्रिय श्री देवेंद्र भुजबळ साहेब*
*नमस्कार*
*आपल्या कार्यकर्तृत्वाची ओळख करून देण्याची गरज नाहीच, तरीही , आपण विविध सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामाची ओळख समाज विसरत नाही आणि तेच समाजभान ठेवून शासकीय सेवा काळात बजावलेल्या कामाची ओळख म्हणून, काही पुरस्कार जाहीर होत असतातच. परंतु आपणांस भारत सरकारच्या नोंदणीकृत माणुसकी सोशल फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा ” माणुसकी सेवा पुरस्कार ” प्राप्त झाल्याबद्दल आपले मनःपूर्वक – मनापासून अभिनंदन !!*
*आपणांस भविष्यात अनेक सामाजिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळावेत अशी अपेक्षा आहे. आपल्याला
आरोग्यदायी , आनंददायी , आयुष्य लाभो हीच आमची मनोकामना !!*
*राजाराम जाधव आणि परिवार , उलवे नवी मुंबई*
श्री देवेंद्र भुजबळ सरांचे हार्दिक अभिनंदन!💐
ह्या पुरस्काराचे स्थान अत्युच्च आहे. माणुसकी, सेवाभाव हे अलिकडे सर्वात दुर्मिळ झालेले गुण आहेत. आपण आपल्या कार्याद्वारे आणि आपल्या संवेदनशील वृत्तीद्वारे मनुष्यपणाचा एक आदर्श आम्हा सर्वांसमोर स्थापित केला आहे. समाज कल्याणार्थ आणि कला संवर्धनार्थ आपण करत असलेले कार्य खूप थोर आहे.
आपल्याला निरामयी आरोग्य लाभो, आपले यश असेच उत्तरोत्तर वृद्धींगत होवो ह्या शुभेच्छा आणि आम्हाला आपले आशीर्वाद लाभोत ही प्रार्थना 🙏🏻
पुन्हा एकदा आपले खूप खूप अभिनंदन!
श्री देवेंद्र भुजबळ सरांचे हार्दिक अभिनंदन 💐
हा पुरस्कार आपल्याला मिळाला त्या बद्दल
मनःपुर्वक अभिनंदन. आपला ह्या पुरस्कारायोगे
यथोचीत सन्मान केला गेला ह्या बद्दल खुप
आनंद वाटला . 🙏😊🌹
हार्दिक अभिनंदन काका
माणुसकी हा शब्द आता फार दुर्मिळ झाला आहे.
ह्या एका शब्दात जग सामावलेलं आहे.
असा पुरस्कार माननीय श्री. देवेंद्र भुजबळ साहेब यांना मिळाला त्याबद्दल त्यांच हार्दिक अभिनंदन 🌹🌹
साहेब आपण असचं पुढे जात राहावं. आपण एक प्रेरणा स्थान आहात.
आपणास उदंड आयुष्य लाभो. हीच प्राथर्ना.
अशोक साबळे पाटील
महाड
🌹🌹हार्दिक अभिनंदन साहेब 🌹🌹
माननीय देवेंद्र भुजबळ..
आपणास माणूसकी सेवा गौरव पुरस्कार मिळाला..अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बातमी.आपले मनापासून अभिनंदन!!
आपले कार्य, आपले सामाजिक भान ,आपली रसिकता,
कलाप्रेमी मन ,आपण जोडलेला अफाट लोकपरिवार ,आणि सतत इतरांना प्रोत्साहित करण्याची ,प्रेरणादायी वृत्ती थक्कच करणारी आहे.. आपणांस ऊदंड यश ,आरोग्य दीर्घायुष्य लाभो हीच शुभेच्छा!!
🌹🌹खूप छान 🌹🌹