देशविदेशात सैर करुनी आले देवेंद्र।
ज्ञानार्जन करुनी केले समाजप्रबोधन।
भुजबळात साकारली लेखनी
ज्ञानाम्रुत पाजले जनमानसात।
सुंदर सुशील, सुरेख
अमृतधारा वाहते मनामनात।
मनही प्रसन्न, विचारही जाहले सकारात्मक।
नवनवीन कल्पना झाल्या साकार।
समाजास लाभला देवेंद्र
निःस्वार्थ सेवा करतो तळमळीने।
आशिष आहे सुशिलाईचा।
माया करते सुनंदा, स्मिता, सुचित्रा
भाग्यवान तुम्ही।
खंबीर साथ अलकादेवीची उभी पाठीशी।
कन्या रत्न देवश्री तेजाळती हाती लेखनी साकारून।
उज्ज्वल होऊ दे तुमचे जीवन
प्रणाम करते सुरेखागोरक्ष।
धन्य झाले शकुंतला, सोमनाथ
जीवन गौरव उत्कर्ष बघुनी।
समाजभुषण आहेस तू
हीच शब्द पुष्पांजली
नमन करतो आम्ही तुम्हास
जपली संस्कृती।।

– रचना : सौ सुरेखा गोरख रासने. संगमनेर
वा वा ,खूप छान कविता वहीनी ,यथार्थ ,तूमच्या ह्या पैलूचे सोने होओ .अर्थात देवेंन्द्ररूपी हिरा असल्यावर कविता ही स्फूरणारच की 👌👍👍🙏🙏