नमस्कार, मंडळी.
या वेळी नेहमीप्रमाणे शनिवारी “वाचक लिहितात” हे सदर प्रसिद्ध करता आले नाही कारण त्या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी होती तर दुसऱ्या दिवशी मराठी भाषा गौरव दिन होता. असो.
गेल्या आठवड्यात आपण स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने “सावरकर समजून घेताना” ही अभ्यासक श्री हेमंत सांबरे यांची लेखमाला प्रसिद्ध केली. तिला वाचकांचा छान प्रतिसाद मिळाला.
सर्वच मोठ्या साहित्य संमेलनांना सर्वच जण हजर राहू शकत नाहीत. तसेच आपल्या पोर्टलवर लेखन करणाऱ्या व्यक्ती विविध क्षेत्रात कार्यरत आहेत, हे पाहून आपण नाशिक येथे छोटेखानी स्नेह मिलन आयोजित केले होते. त्यास तसेच त्याच्या बातमीला खूपच उस्फुर्त प्रतिसाद मिळाला, हे पाहून शक्य असेल तेव्हा इतरत्रही असे स्नेह मिलन आयोजित करण्याचा मानस आहे. आपला लोभ आहेच, तो वाढता असू द्या.
या आठवड्यात प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.
आपला
– देवेंद्र भुजबळ. संपादक.
मराठी माणसाची भाषिक जबाबदारी..
वास्तव परिस्थितीची अतिशय समर्पक शब्दात जाणीव करून देणारा लेख खुप छान
– नितीन प्रधान.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचं सामाजिक समतेत अमुल्य योगदान…
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे चरित्र हा फक्त इतिहास नसून भारतियांनी तो वर्तमान आणि भविष्य या अनुषंगाने समजावून घेतले पाहिजे, जाज्वल्य देशभक्ती ही त्यांच्याकडूनच आणि जाज्वल्य धर्माभिमान छत्रपती संभाजी राजे यांच्या चरित्रा वरुन घ्यावा. जयहिंद
– शंतनु श.कडुसकर
सखे सृष्टीतले
अरुणा मुल्हेरकर यांची पक्षी प्राण्यांविषयी आस्था दाखवणारी
मैत्रीचे नाते हे मधुसिंधु काव्य छानच…
चराचरावर प्रेम करा ..असा संदेश देणारी
– राधिका भांडारकर.
मैत्री…
खूप छान वर्णन कवितेतून शब्दबध्द केलेत 👌👍👍🎉🎉
– डॉ स्वाती दगडे.
“सरदारधाम”: आधुनिक तीर्थक्षेत्र
लेख खुप आवडला. सगळीकडे, प्रत्येक राज्यांत, राष्ट्रांत असे “सरदार धाम” निर्माण झाले तर किती धान होईल. व तेहि फक्त मुलींसाठीच नाहीत तर सर्व विद्यांर्थ्यासाठी व्हायला हवेत. काठोळेसरांचे मन:पूर्वक आभार.
युनोत मराठी हवी…
अतिशय सुंदर, सविस्तर लेख. मी पूर्णपणे सहमत आहे. धन्यवाद दिलीप गडकरी.
– लीना फाटक. यु.के.
मैत्रीची कविता, व्याख्या
अप्रतिम. 🌹🌹
रश्मी हेडे
🌹🌹
मी Indian Navy मध्ये असल्यामुळे खूप वेळा अंदमान निकोबार ला गेलो आहे.
Cellullar jail ला खूप वेळा भेट दिली आहे.
सध्या तेथे Light and Sound show असतो संध्याकाळी.
खूप छान असतो.
🌹🌹
सर आपला खूप गाढा अभ्यास आहे.
धन्यवाद कि आपण सत्य माहिती जगासमोर आणली आहे. 🌹🌹👍👌
लालबत्ती (२१)
खूपच छान लेखन 🌹🌹 अभिनंदन.
True to the fact
– अशोक बी साबळे पाटील. महाड
मैत्री…
💦 मैत्रीची ओळख खुप छान प्रकारे करून दिली.
सुंदर रचना केली.
👌👌👍👌👌
– सुभाष कासार. नवी मुंबई.
ओठावरलं गाणं…
श्रीधर फडके यांनी संगीत दिलेल्या अनेक उत्कृष्ट गाण्यांपैकी हे एक सुरेल गाणे. या गाण्याचे कवी नितीन आखवे आहेत हे अनेकांना माहीत नाही. आरती अंकलीकर टिकेकर यांनी ते अतिशय सुंदर आवाजात सादर केले आहे. अशा सुंदर गाण्याचे सुरेख भाषेत रसग्रहण करून आपण जुन्या स्मृतींना उजाळा देत आहात. देवेंद्र भुजबळ विकास भावे यांना हे सदर चालू केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
– विवेक भावे
खरोखरच गाडगेबाबा म्हणजे देवाचे दूतच…
“सावरकर समजून घेताना” ( ३ )
हेमंतसांबरे यांचे सावरकरांवरचे लेख अतिशय अभ्यासपूर्ण आणि सावरकरांच्या व्यक्तीमत्वाचे परिपूर्ण पैलुंचे दर्शन घडवणारे आहे..
सावरकरांचे विचार काळाच्या पुढे होते…खरंय्
आजच्या पीढीला सावरकरांचे चरित्र अभ्यासण्याची गरज आहे…
– राधिका भांडारकर
माणुसकीचा गौरव..
माणुसकीची सेवा’ हा पुरस्कार मिळाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन 👍👍🎉🎉🙏🙏, स्वकर्तुत्वावर मिळविलेल्या यशाचे खूप खूप कौतुक. तूम्हा उभयतांचे अभिनंदन. पुरस्कार मिळाल्यामुळे निंरतर कामात असलेल्या तूझ्या पंखातील बळ द्विगुणीत होईल, होवो 🙏🙏व आमच्या सारख्यांना प्रेरणा मिळो 🙏🙏
भावलेले देवेंद्र…
वा वा, खूप छान कविता वहीनी, यथार्थ, तूमच्या ह्या पैलूचे सोने होवो. अर्थात देवेंन्द्ररूपी हिरा असल्यावर कविता ही स्फूरणारच की 👌👍👍🙏🙏
– डॉ स्वाती दगडे.
मन भरून आले…
आदरणीय देवेन्द्रजी मन भरून आले या आपल्या सुंदर मनोगतात असलेल्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया वाचून मन आनंदाने भारावून गेले. आजची सुरेखा ताईंची कविता तसेच कालचा श्री. मदन लाठी यांचा लेख आणि भरारी प्रकाशनच्या प्रकाशिका लता गुंठे यांनी दोन दिवसांपूर्वीच पाठवलेलं तुमचं प्रेरणेचे प्रवासी हे पुस्तक सारा मणीकांचन योग जुळून आला आणि माझा आनंद गगनाला भिडला, प्रेमपूर्वक अर्पितो आपणास अभिनंदनाची पुष्पमाला बहरत राहो सदैव जीवनी आपुल्या आनंदाचा मळा.
– राजेंद्र वाणी. दहिसर मुंबई 🙏🌹
मन भरून आले…
आदरणीय देवेंद्रजी भुजबळ साहेब,
सस्नेह नमस्कार.
आपणास राज्यस्तरीय माणूसही सेवा गौरव पुरस्कार प्राप्त झाला, हे ऐकून मनस्वी खूप आनंद झाला आपले मनापासून खूप खूप अभिनंदन !
आपल्या महान कार्यामुळे आपणास राज्यशासनाकडून मिळालेली पावती आहे. हा पुरस्कार समाजात भूषणावह नि अभिमास्पद आहे. आपण पुरोगामी विचारवंत आहात.
आपल्या कार्य भान राखून बेभान होणारे आहे.
आपल्या कार्याचा आम्हास अभिमान तर आहेच, त्याहीपेक्षा ते कार्य अधिक … दिशादर्शक, मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहे.
देवघरात लावलेल्या नंदादीपाप्रमाणे आपल्या कार्याची ज्योत जगतात सतत तेवत राहो प्रकाशमान होवो !
ह्या कार्यामध्ये सिंहाचा वाटा आपल्या सौभाग्यवती अलकाताईंचा हे विसरून चालणार नाही, त्यामुळे सौ. अलकाताईंचेही मनःपूर्वक अभिनंदन !
आपले आदर्श समाज कार्य अखंड चालू राहो, त्यासाठी आपणास व कुटुंबियांस आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभावे, हीच श्री कृष्णकांत सासवडे सर आणि परिवाराकडून श्रीकालिका मातेचरणी प्रार्थना !
शुभेच्छुकः-
श्री कृष्णकांत सासवडे सर, चिंचवड आणि श्री अमोल सासवडे आणि परिवार, चासकमान
मनःपूर्वक अभिनंदन देवेन्द्र! You deserve it.
– प्रीति परदेशी
भुजबळ साहेब,
मनःपूर्वक अभिनंदन
– हिरालाल पगडाल
श्री देवेंद्र भुजबळ सरांचे हार्दिक अभिनंदन 💐
हा पुरस्कार आपल्याला मिळाला त्या बद्दल
मनःपुर्वक अभिनंदन. आपला ह्या पुरस्कारायोगे
यथोचीत सन्मान केला गेला ह्या बद्दल खुप
आनंद वाटला . 🙏😊🌹
– राजेश रा. सुर्व
सर आपण उभयता करता आहात त्या सेवाभावी कार्या बद्दल योग्य वेळी मिळणारा पुरस्कार. अभिनंदन.
– सोमनाथ साखरे
आपणास राज्य स्तरीय माणुसकी सेवा पुरस्कार मिळाल्याचे वाचून अतिशय आनंद झाला. या पुरस्काराचं नाव आणि आपलं आजपर्यंतचं इतरांसाठी केलेलं काम यात अद्वैत आहे. आपल्या अद्वितीय कामाचं हे पारितोषिक सुंदर फळ आहे.
मन:पूत अभिनंदन आणि अनंत शुभेच्छा!
– अजित मगदूम
माननीय देवेंद्रजी, आपल्याला माणुसकी गौरव पुरस्कार मिळाल्याचे वाचून खुप खुप आनंद झाला. श्री. मदन लाठे यांनी आपल्या कार्याचा, कारकिर्दीचा लिहिलेला फार सुंदर आढावा वाचून आपल्याबद्दलचा आदर द्विगुणित झाला. उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या व माणुसकी जपणाऱ्या आपल्या सारख्या योग्य व्यक्तिला हा पुरस्कार मिळायला हवाच याबद्दल शंकाच नाही. असेच उत्तरोत्तर अगणित पुरस्कार आपल्याला लाभोत ह्या सदिच्छां. आपले कार्य असेच अखंड सुरू राहो ह्या शुभेच्छां. आपल्या कार्यात अलकाताईंचा पण बहुमोल सहभाग नक्कीच आहे. आपणा उभयतांना निरामय जिवन लाभो व आपण दोघांनी लावलेली समाजसेवेची ज्योत अखंड तेवत राहो. मनापासून हार्दिक अभिनंदन.
– लीना फाटक. यु.के.
👏👏💐💐💐💐👏💐
नमस्कार, श्री देवेंद्र भुजबळ ह्यांचे हार्दिक अभिनंदन. आपल्या कार्याची आपणांस ही राज्यस्तरीय पावती मिळाली आहे.
असेच आपले कार्य चालू ठेवावे व सर्वांना प्रोत्साहित करत रहावे. आपल्या वेबपोर्टलमुळे खूप काही माहिती मिळते, तसेच स्वत:चे काही अनुभव लिहिण्याची स्फुर्ती मिळते.
॥ यशस्वी भव ॥ 🙏💐🙏
– रविंद्र वेळापुरे
भुजबळ सर यांना मिळालेला सन्मान उचित आहे ! त्यांचे मनापासून अभिनंदन⚘⚘
– प्रतिभा सराफ
देवेंद्र भुजबळ सरांना राज्यस्तरीय माणुसकी सेवा गौरव पुरस्कार मिळाला, हे वाचून खूप आनंद झाला. प्रेरणादायी व्यक्तिमत्व व मेहनतीने भरलेला करियर ग्राफ, म्हणजे सरांचा अखंड वाहता झरा आहे.
खूप खूप अभिनंदन ॥ सर,
– सौ. वर्षा महेंद्र भाबल.
मा. देवेंद्रजी भुजबळ साहेब आपण विविध सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन आपणास माणुसकी सेवा गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल आपले व सौ अलका भुजबळ मॅडम दोघांचेही हार्दिक अभिनंदन. आपणास. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🌹
– मोहन बाबुराव आरोटे
युगपुरुष शिवाजी महाराज: हिरालाल पागडाल यांचा महाराजांवरील लेख अप्रतिम आहे.
छत्रपतींचा जीवन परिचय अतिशय माहितीपूर्ण आहे खूप छान माहिती मिळाली धन्यवाद टीम एनएसटी.
खरंच राधिका ताई तुम्ही म्हणता त्या प्रमाणे महाराजांना समजून घेतले पाहिजे आणि आपल्या दैनंदिन कार्यात त्यांचे गुण सामावून घेतले पाहिजेत. शिवरायांचे आदर्श गुण पिढ्यान् पिढ्यांमध्ये झिरपले पाहिजेत. खूप सुंदर विचार 👌🏻
आज काल सर्रास स्त्रियांवर अत्याचार होत आहेत अशा वेळी राजे तुमचीच आठवण येते. राजे तुम्ही असायला हवे होता.अनिता गुजर खूप छान लिहिता तुम्ही अगदी अप्रतिम ताई.👍
महाराजांवरील सर्वच कविता आणि पोवाडे अत्युत्तम👌🏻👌🏻🙏🏻.
देवेंद्र भुजबळ सर आपल्याला राज्यस्तरीय माणुसकी गौरव पुरस्कार मिळाल्या बद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन मदन लाठी यांनी आपल्या कार्याचा घेतलेला आढावा माहितीपूर्ण आपल्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा💐
दिलीप गडकरी यांचे विचार खूप छान खरंच युनो मध्ये मराठी समाविष्ट केली जावी. 👍
स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या बद्दल खूप पुस्तके वाचनात आली आहेत. आदरणीय सावरकर समजून घेताना : हेमंत सांबरे यांचा लेख उत्तम भाग १ म्हणजे आणखी भाग वाचायला मिळणार खूप स्वागत हेमंत जी🙏🏻
मनीषा ताई केरळ बद्दल नेहमीच मस्त माहिती घेऊन येतात. धन्यवाद ताई भगवती मंदिरा ची छान माहिती मिळाली.
भुजबळ सरांच्या यशोगाथे वर अतिशय सुंदर काव्यरचना राजेंद्र वाणी यांची माणुसकीचा गौरव कविता खूप आवडली👍👌🏻
हेमंत सांबरे सावरकरां विषयी खूप सुंदर माहिती देत आहात वाचताना ज्ञानात भर पडत आहे. धन्यवाद🙏🏻
विसुभाऊ बापट यांचा लेख खूप छान कव्यावाचनाच्या कार्यक्रमातून लोकसेवा करण्याच्या वृत्तीला सलाम
वाह खूप छान सुरेखा ताई, देवेंद्रजींच्या
कार्यावरील काव्य रचना खूप छान 👌🏻🙏🏻
संत गाडगे बाबा हे माणसांत देव शोधणारे संत होते. अनिष्ट चालू रीती, रूढी परंपरांना संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्नशील होते. आपल्या कीर्तनातून सहज सोप्या भाषेतून समाजप्रबोधनाचे काम करीत होते. यात जातीभेद व्यसनमुक्ती प्राण्यांची हत्या इत्यादी गोष्टी रोखण्यासाठी प्रयत्न करीत असत
अशा देव दुतास शताश: प्रणाम🙏🏻
खूप छान माहितीपूर्ण लेख पूर्णिमा ताई.
सावरकरांचे अवघे जीवन म्हणजे अग्निकुंड सावरकर समजून घेताना भाग ३ खूप छान माहिती मिळत आहे.
धन्यवाद हेमंत सांबरेजी.
मी राधिका प्रेमिका: ओठावरल गाणं विकास भावे यांनी खूप सुंदर रसग्रहण केले आहे.
पंकज कासार यांची गाडगे बाबां वरील
कविता स्वच्छता दुत अप्रतिम.🙏🏻
हिंदुत्वा वर खूप छान माहिती मिळाली सावरकर समजून घेताना : हेमंत सांबरे यांचा लेख भाग ४ छान माहितीपूर्ण लेख👍
पद्मगंधा प्रतिष्ठान ला खूप खूप शुभेच्छा💐खूप छान माहिती संगीता ताई.
मैत्रीची व्याख्या कवितेतून खूप छान सांगितली रश्मी ताईंनी 👌🏻🙏🏻
सुनिता ताईंचा मी पोलीस अधिकारी झाले लेख क्रमशः आहे पण मी नेहमीच त्यांच्या लेखाची वाट पाहत असते त्यांची शौर्य गाथा वाचताना खूप बरे वाटते. खूप छान ताई👍
आज वीर सावरकर स्मरणदीन आहे. सावरकर आम्हाला वंदनीय आहेत आणि हेमंत सांबरेजी खूप छान माहितीपूर्ण लेख आहे तुमचा. सावरकर समजून घेताना छान वाटतंय.
बातमीदारी करतांना डॉ किरण ठाकूर यांचे अनुभव वाचतांना अंगावर काटा येतो जसे सुनिता ताईंनचे अनुभव तसेच किरण भाऊंचे पत्रकारी पण काही सोपी गोष्ट नाही हे जाणवतं.
अरुणा ताईंची सखे सृष्टीतील कविता खूप छान माणसां पेक्षा प्राणीच खूप इमानदार असतात. 👍
धन्यवाद टीम देवेंद्र भुजबळ सरआणि अलका ताई 🙏🏻
– सुप्रिया सावंत. पनवेल, नवी मुंबई.
अलका मनःपूर्वक अभिनंदन💐💐💐💐💐खूप अलौकिक काम करत आहात👌👌👌👌अभिमानास्पद आहे.खूप खूप शुभेच्छा श्री देवेंद्र भुजबळ यांना.
– Karkalmatti
प्रिय श्री देवेंद्र भुजबळ साहेब
नमस्कार,
आपल्या कार्यकर्तृत्वाची ओळख करून देण्याची गरज नाहीच, तरीही, आपण विविध सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामाची ओळख समाज विसरत नाही आणि तेच समाजभान ठेवून शासकीय सेवा काळात बजावलेल्या कामाची ओळख म्हणून, काही पुरस्कार जाहीर होत असतातच. परंतु आपणांस भारत सरकारच्या नोंदणीकृत माणुसकी सोशल फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा, “माणुसकी सेवा पुरस्कार” प्राप्त झाल्याबद्दल आपले मनःपूर्वक – मनापासून अभिनंदन !!
आपणांस भविष्यात अनेक सामाजिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळावेत अशी अपेक्षा आहे. आपल्याला आरोग्यदायी, आनंददायी, आयुष्य लाभो हीच आमची मनोकामना !
– राजाराम जाधव आणि परिवार, उलवे-नवी मुंबई
श्री देवेंद्र भुजबळ सरांचे हार्दिक अभिनंदन !💐
ह्या पुरस्काराचे स्थान अत्युच्च आहे. माणुसकी, सेवाभाव हे अलिकडे सर्वात दुर्मिळ झालेले गुण आहेत. आपण आपल्या कार्याद्वारे आणि आपल्या संवेदनशील वृत्तीद्वारे मनुष्यपणाचा एक आदर्श आम्हा सर्वांसमोर स्थापित केला आहे. समाज कल्याणार्थ आणि कला संवर्धनार्थ आपण करत असलेले कार्य खूप थोर आहे.
आपल्याला निरामयी आरोग्य लाभो, आपले यश असेच उत्तरोत्तर वृद्धींगत होवो ह्या शुभेच्छा आणि आम्हाला आपले आशीर्वाद लाभोत ही प्रार्थना 🙏🏻
पुन्हा एकदा आपले खूप खूप अभिनंदन !
– गौरी जोशी-कंसारा
माणुसकी हा शब्द आता फार दुर्मिळ झाला आहे.
ह्या एका शब्दात जग सामावलेलं आहे.
असा पुरस्कार माननीय श्री. देवेंद्र भुजबळ साहेब यांना मिळाला त्याबद्दल त्यांच हार्दिक अभिनंदन 🌹🌹
साहेब आपण असचं पुढे जात राहावं. आपण एक प्रेरणा स्थान आहात.
आपणास उदंड आयुष्य लाभो. हीच प्राथर्ना.
– अशोक साबळे पाटील. महाड
देवेंद्र भुजबळ यांना राज्यस्तरीय माणूसकी सेवा गौरव पुरस्कार
माननीय देवेंद्र भुजबळ..
आपणास माणूसकी सेवा गौरव पुरस्कार मिळाला..अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बातमी. आपले मनापासून अभिनंदन!!
आपले कार्य, सामाजिक भान, आपली रसिकता, कलाप्रेमी मन, आपण जोडलेला अफाट लोकपरिवार आणि सतत इतरांना प्रोत्साहित करण्याची, प्रेरणादायी वृत्ती थक्कच करणारी आहे.. आपणांस ऊदंड यश, आरोग्य दीर्घायुष्य लाभो हीच शुभेच्छा !!
आजही राजे तुम्ही हवे होतात…
अगदी खरे..सद्यस्थिती इतकी शोचनीय आहे की अशा युगपुरुषाची आज समाजाला गरज आहे..
युगपुरुष छ. शिवाजी महाराज
हिरालाल पगडालाल यांनी शिवाजी राजा आणि त्यांच्या संपूर्ण कार्यपद्धतीचा अतिशय सुरेख आढावा घेतला आहे..
पुन्हा पुन्हा वाचावा असाच हा प्रेरणादायी इतिहास आहे..जाणावा शिवाजी..ओळखावा शिवाजी..
– राधिका भांडारकर
शिवजयंती : शपथ घेऊ या !
अतिशय सुंदर लेखन. प्रत्येकाने वाचलेच पाहीजे.
– अरूणा मुल्हेरकर
वय ओशाळाले इथे…
खूप छान 👌👍👍🙏🙏🙏, उद्बोधक, प्रेरणादायी 🙏🙏🙏
– डॉ स्वाती दगडे.
खुप छान माहिती. थॅक्स नीला
– आरती करमरकर