Friday, February 13, 2026
Homeबातम्या"इत्यंभूत": शुक्रवारी पुण्यात प्रकाशन

“इत्यंभूत”: शुक्रवारी पुण्यात प्रकाशन

इंदूर येथील ज्येष्ठ पत्रकार, चित्रकार, आपल्या न्यूज स्टोरी टुडे पोर्टलचे श्रेष्ठ लेखक श्री श्रीकृष्ण बेडेकर यांच्या बहुविध जीवन कार्यावर आधारित असलेल्या “इत्यंभूत” या ग्रंथाचे प्रकाशन शुक्रवार, दिनांक १० जून २०२२ रोजी पुणे येथे संध्याकाळी ५ वाजता न्यू इंग्लिश स्कूल मध्ये होत आहे, ही आपल्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. या प्रकाशन सोहळ्यास आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहू या.

आयुष्यभर महाराष्ट्राबाहेर राहून महाराष्ट्र आणि मराठीशी जोडलेली आपली नाळ कायम जपत आलेले
श्री बेडेकर हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे मित्र, हितचिंतक राहिले आहेत. त्यांच्यावरील हा ग्रंथ मराठी साहित्यात नक्कीच मोलाची भर घालणारा, वैशिष्ट्यपूर्ण असा असेल यात काही शंकाच नाही.

सत्कार समितीतर्फे देण्यात येणारे पुढील मानपत्र त्यांच्या मोठेपणावर नक्कीच योग्य तो प्रकाश टाकणारे आहे.

पुढे निमंत्रण पत्र देत आहे. तरी या प्रकाशन सोहळ्यास आपण कृपया अवश्य उपस्थित रहावे, ही आग्रहाची विनंती.
आपला
देवेंद्र भुजबळ. संपादक, न्यूज स्टोरी टुडे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Kavitha Tenny Nadar on झेप : 11