Friday, November 22, 2024
Homeबातम्याविद्यार्थ्यांची आषाढी दिंडी

विद्यार्थ्यांची आषाढी दिंडी

राज्यात सर्व ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. सर्वत्र हिरवाईचा साज चढला आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरचा पांडुरंग. पांडुरंगाचा पालखी सोहळा पंढरपुरात नुकताच मोठ्या आनंदाने पार पडला.

गेली 15 वर्ष नूतन ज्ञान मंदिर, कल्याण (पूर्व) ही मराठी माध्यमाची शाळा दिंडी आणि विठू रायाचा पालखी सोहळा आयोजित करीत आहे. हीच परंपरा कायम ठेवत या ही वर्षी हा पालखी सोहळा शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा केला. विद्यार्थ्यांना अभ्यासा सोबतच स्वच्छंदी जिणे आवडत असते. पण यातील सर्वांना शालेय जीवन आवडावे, त्यांना शालेय शिक्षणाची गोडी लागावी म्हणून काही शाळा प्रयत्नशील असतात. त्यापैकीच एक शाळा म्हणजे कल्याणच्या पूर्व भागातील नूतन ज्ञानमंदिर शाळा होय.

कल्याण पूर्व येथील छत्रपती शिक्षण मंडळ संचालित नूतन ज्ञानमंदिर शाळेने शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या सुरुवातीला आषाढी एकादशीचा पालखी सोहळात मोठया उत्साहाने विद्यार्थी शिक्षक सहभागी होतात. हे विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत मध्ये येतात. सोबतच लेझीम ढोल-ताशांच्या गजरामध्ये विठुनामाचा गजर करत पालखी शाळेतून प्रस्थान करते. तत्पूर्वी शाळेत विठ्ठलाच्या पालखीची मुख्याध्यापिका सौ मीनाक्षी गागरे यांच्याकडून विधिवत पूजा केली जाते.

उपमुख्याध्यापक श्री बबन निकुम तसेच पर्यवेक्षक श्री विजय भामरे हे या पूजेमध्ये सामील होतात. शाळेसाठी आरोग्यदायी शिक्षण तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास यासाठी साकडे घातले जातो. शाळेच्या प्रागंणात एक रिंगण पूर्ण करून पालखी विठ्ठल मंदिराकडे प्रस्थान करते. ढोल-ताशांच्या तालावर लेझीम खेळणारे विद्यार्थी पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातून नागरिक रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करतात. हा सोहळा पंढरपुरातील वारीची आठवण करून देणारा आणि स्मरणात राहणारा असा असतो.

विठूनामाचा गजर करत विद्यार्थी पालखीसोबत टाळ-मृदुंगाच्या तालामध्ये तल्लीन होऊन जातात. कोणी जनाई, कोणी तुका, कोणी नामा या पालखीत सहभागी होतात. विठ्ठल रुक्माईचा वेश परिधान केलेले विद्यार्थी सगळ्यात उठून दिसतात. मंदिराच्या प्रांगणात रिंगण पूर्ण करून विद्यार्थी विठ्ठलाचे दर्शन घेतात आणि मंदिरात अभंग किर्तनाने भक्तजनांना मंत्रमुग्ध करतात. शाळेच्या सांस्कृतीक प्रमुख कु.अस्मिता सावंत तसेच सौ ममता वसावे तसेच विद्यार्थ्यांन कडून लेझीम शिकवणारे व सराव करून घेणारे श्री गोकुळ गवळे व सौ हर्षा गावित यांचे ही मार्गदर्शन खूप मोलाचे आहे.

शिक्षक-शिक्षकेतरांचा सहभाग
शाळेच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी गागरे अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण तसेच अनोख्या संकल्पनेने नटलेले कार्यक्रम करण्यास नेहमी प्रोत्साहन देतात. म्हणूनच नूतन ज्ञानमंदिर ही शाळा गेली अनेक वर्षे साहित्य आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचे कार्य करते. तसेच ज्ञानदानासोबतच समाजिक बांधिलकीचा दुर्वांकुर रुजवण्याचे कार्य करीत आहे. शाळेचे उपमुख्याध्यापक बबन निकुम, पर्यवेक्षक विजय भामरे, तसेच शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांचाही यात मोलाचा वाटा आहे.

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments