Tuesday, June 17, 2025
HomeUncategorizedअरे विवेक विवेक....

अरे विवेक विवेक….

अरे विवेक विवेक….

विवेक हा काही मागून मिळत नाही. माणसाची वृत्ती, त्याची विचारसरणी, प्रवृत्ती, त्याची जडण घडण त्यास घडवत असते.

पावले हळू टाकाल तर तुम्ही सावरणार. पण पावले जर विचार न करता न टाकाल तर पुढें काय असेल ते तुम्हाला न सांगणेच बरे ! इथे विवेकाची गरज असते.

तुमचे विचार, तुमची योजना ह्या अनेक बाबी हीच तर विवेकाची नांदी असते. जसा विवेक, विचार असेल तसेच ते घडत असते. उदा. तुम्ही जर मनात एका छान गोष्टीचे आयोजन केलेत आणि हे आपल्याला पूर्ण करायचेच आहे असे ठरविले तर आपसुकच तुम्ही त्याचा पाठपुरावा करणारच आणि त्यातच ध्येयपुर्तीचा आनंद तुम्हाला मिळेल.

विवेकाचा विकास हा तुमचा खरा प्रवास आहे. त्या प्रवासात व त्याप्रवाहात तुम्हाला पोहायचे आहे की बुडायचे आहे. ते तुम्हींच ठरवायचे आहे. जसे “मन चिंती तसे आचरण वळती”.

विवेकाचा प्रवास हा न संपणारा आहे. ह्या प्रवासात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. चांगले, वाईट हे घडतच असते. त्याचा नाही म्हटले तरी स्वीकार करावाच लागतो आणि इथे खरा कस असतो तो विवेक करण्याचा. विवेकाची दिशा ठरवणे हेच तर खरं महत्वाचे आहे. तुमचे विचार म्हणजेच विवेक तुम्हाला घडवित असतो.

आता तुम्हीं एक उदाहरण बघा, घरातील परिस्थिती ही त्यास कधी कधी कारणीभूत ठरत असते. एखादी गोष्ट तुम्हाला सहज प्राप्त होत नसेल, तर ते कसे मिळेल कुठे मिळेल ह्याचा तुम्हीं पाठपुरावा कराल, विचार कराल, पण ते मिळाले नाही की तुम्हीं ते मिळविण्यासाठी जे अथक प्रयत्न करत होता आणि त्यात यश आले नाही की, तुमचे विचार, वृत्ती, प्रवृती लगेच बदलेल. तुमचा राग, लोभ, आनंद, हीच तर खरी तुमच्या विवेकाची नांदी ठरत जाते हो ना !!? विवेक तुमचा मित्र पण आहे आणि शत्रु पण आहे. होत्याचे नव्हते करणारा तो विवेक.. विवेका ची दिशा ही दिशाहीन नसावी, नाहीतर देशोधडीला लागायला वेळ लागणार नाही.

आपल्या आजुबाजूस, शेजारी पाजारी, समाजात तुमचे स्थान प्राप्त करणे तुमचे विचाराअंतीच ती पूर्व दिशा ठरू शकते. तर सांगणे हेच, तुमचा विवेक विचार हा सर्वस्वी तुमचा अधिकार आहे. त्या अधिकाराची पूर्ती चांगलीच दिशा मिळावी. हे सुज्ञास न सांगणेच बरे !

सुप्रिता यंदे

– लेखन : सुप्रिता यंदे.
– संपादन : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

6 COMMENTS

  1. Suprita writes, Suprita sings.She writes well, She sings well. This write up on “Vivek” proves my statement. I think this is a good start. We wish her bright future in the every area she ventures into

  2. खूप सुंदर ,
    विवेक बुध्दी मुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात येणाऱ्या संकटांना न घाबरता अतिशय उत्तम रितीने सामना करू शकता व सफल होऊ शकता
    तुमचे विचार तुम्हाला प्रगतीकडे घेऊन जाऊ शकतात चांगले विचार हे तुमचे आयुष्य घडवित असते त्यामुळे चांगले रहा, चांगले वाचा ,चांगले विचार करा
    खूपच चांगला लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments