आयुष्य हीच शिक्षा
काही गुन्हा न करता
फाशी दिले तयानी
सरणावर जाता जाता
प्रत्येक व्यक्ती चुकतो
चुकलो असेन मीही
माझ्याच भावनांच्या
पायात पाय देता?
सत्य बोलणे स्पष्ट
एवढी समस्या माझी
त्याचेच भांडवल होते
नैतिकतेने जगता
दारात पाहुणा आला
तुम्हाला द्याया काही
मानून त्यास परका
असे कसे हाकलता ?
मी मानले स्वतःला
नाही कधी शहाणा
अद्न्यान जाणवे ते
खोलात पाय जाता
हे युद्ध ही अशांती
वाटे मला नकोशी
मी बुद्ध शोधतो आहे
गल्लोगल्ली आता !!

— रचना : विजय पांढरीपांडे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
