Monday, February 16, 2026
Homeसाहित्यतिळा तिळा …..

तिळा तिळा …..

रूचेनात कोणा
सहजी हे बोल
स्वत: वाजविती
स्वत:चे ढोल

कुणालाच काही बोलायचे नाही
फुकाचा रूसवा घ्यावयाचा नाही

आहे खूप
आत्मकेंद्री माणूस
चाणक्यही आहे
कान्हीचे कणीस

हुशारही आहे
आहे तो अडाणी
कठीणच आहे
एकूण कहाणी

मनी खूप आहे माणसाचा गुंता
सुटेना ग्रहण
सुटेनाच चिंता

खोलातच जातो कळेनाच पाय
सापडत नाही
काहीच उपाय

चुका झाल्यातरी
मानतच नाही
क्षमा ही कुणाला
करतच नाही

स्वभावास हट्टी
औषधचं नाही
अंगाची ती होते
लाही लाही

विचित्र हे मन
विचित्रच सारे
मनाला ताब्यात
घ्यायला शिका रे

अवघड प्रश्न
अवघड उत्तर
तिळा तिळा
दार उघड

प्रा. सुमती पवार

– रचना : प्रा.सौ.सुमती पवार. नाशिक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Kavitha Tenny Nadar on झेप : 11