मी गीत तुझे गाताना, हरवून स्वतः ला बसते
मग रानोमाळी फिरते नि आसुसते, सळसळते
घेऊन गंध मृद्गंधी स्वर लावी पवन जरासा
दिलरूबा होऊनी तन हे मग प्रेमगीत गुणगुणते
सरितेची खळखळ मधुमय श्रवणात अशी गुंजावी
हे प्रेमगीत गाण्याला ऊर्मींची साथ मिळावी
तालावर नर्तन करती रंगीत फुलांच्या वेली
स्वर लहरत लहरत येता गीतात बहरुनी यावी
मारवा गायला होता तू परत फिरावा म्हणुनी
गीतातच तुला स्मरावे मी तुझीच मीरा बनुनी
अलगूज सदा होऊनी मी तुझ्यासवेच रहावे
थिरकावे त्यावर कान्हा अंगुली तुझीच बनूनी

– रचना : राधा गर्दे. कोल्हापूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

नववधू प्रिया मी बावरते…कवितेची आठवण करून देणारी सुंदर कविता.