“एकनाथ आव्हाड हे मुलांच्या कोऱ्या मनाच्या पाटीवर सुंदर आयुष्याची रेखाटन, चित्र शब्द रुपी रंगवून आनंददायी शिक्षणासाठी जोडाक्षर विरहित बालकविता तसेच वाक्यप्रचार, म्हणी, व्याकरण हे कविता, गोष्टीत गुंफून लेखनाचे वेगवेगळे प्रयोग करत आहेत. आता राज्य एकनाथांचे आहे आणि आमचे एकनाथ दादा शब्दांचे कायमस्वरूपी राजे आहेत. शब्दप्रभू आहेत.” असे गौरवद्गार सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि साहित्यिक डॉ. निशिगंधा वाड यांनी काढले.
जे के मीडिया आणि नॅशनल लायब्ररी, वांद्रे यांच्या वतीने सुप्रसिद्ध बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांना २०२३चा साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल नुकत्याच संपन्न झालेल्या सत्कार सोहळ्यात डॉ. निशिगंधा वाड बोलत होत्या. तर आपल्या सत्काराच्या उत्तरादाखल बोलताना एकनाथ आव्हाड म्हणाले, आजचे बालवाचक साहित्य वाचनाकडे वळले तरच उद्याचे प्रौढ वाचक निर्माण होतील. मुलांमुळेच मला लिहिण्याची प्रेरणा मिळाली आणि माझ्याकडून विविध साहित्यनिर्मिती होत गेली. याकामी डॉ. विजया वाड यांचे आशीर्वाद, मार्गदर्शन सदैव लाभले. ह्या साहित्य प्रवासात मला खूप चांगली माणसं मिळाली. कोरोना काळात घरात बसलेल्या, कंटाळलेल्या मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी छंदातून आनंद कसा मिळेल ह्या प्रामाणिक हेतूने लिहिलेल्या कविता संग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला याचे मला समाधान आहे.

साहित्य अकादमीने बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांच्या ‘छंद देई आनंद’ या पुस्तकावर साहित्य अकादमी पुरस्काराची मोहर उमटवली पण लहान थोरांना ज्यांचे साहित्य पसंतीस उतरते ते एकनाथ आव्हाड हे एक उत्तम बालसाहित्यिक होते, आहे आणि असतील, असे प्रतिपादन जे के मीडियाच्या संचालिका ज्योती कपिले यांनी आपल्या मनोगतात केले.
तर आव्हाड सरांचे साहित्य आणि कथाकथन हे सर्वांना मंत्रमुग्ध करणारे आहे, असे नॅशनल लायब्ररी वांद्रेचे प्रमुख कार्यवाह प्रमोद महाडीक म्हणाले.
सदर कार्यक्रमात बांद्राच्या बी.पी. ई हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी आणि बालकट्टयाच्या मुलांनी एकनाथ आव्हाड यांच्या ‘छंद देई आनंद’ या पुस्तकातील कविता सादर केल्या. तसेच कवी राजेंद्र वाणी यांनी सरांना सन्मानपत्र भेट दिले. विलास देवलेकर आणि विद्या प्रभू यांनी आव्हाड सरांच्या कारकिर्दीवर कविता वाचून दाखवल्या. या निमित्ताने झालेल्या बालकाव्य संमेलनात डॉ.सुमन नवलकर, सूर्यकांत मालुसरे, पंढरीनाथ रेडकर, चंद्रकांत कवळी, संतोष खाड्ये, सुयश देशपांडे यांनी कवितावाचन केलं.
उत्तरोत्तर रंगत गेलेल्या ह्या सोहळ्याचे सूत्रसंचालन पूजा काळे यांनी केले.
सदर कार्यक्रमास कवी मनोज धुरंधर, रविकिरण पराडकर, समीर बने, पुष्पा कोल्हे, शशिकांत सावंत , सोनाली जगताप, वाशीच्या एपीएमसी मार्केटचे यशवंत देशपांडे नॅशनल लायब्ररी, वांद्रेचे अध्यक्ष दिनेश सामंत, अतुल मोहिले, विद्याधर झारापकर असे अनेक कार्यकारिणी सदस्य, ग्रंथपाल धनश्री व्यवहारे आणि अनेक वाचक, हितचिंतक, साहित्यिक उपस्थित होते.
– टीम एनएसटी ☎️ 9869484800
Chitra , tu maze Ansndache zaad aahes. Ya zaadala lagaleli bahurangi, sundar fule pahatana khup prasanna vatate. Omkara khupch chhan lihile aahes. Tala surat gayelele Omkara touches the inner self , halu halu manat kholvar pazarat jate. What more can I write ? These thoughts came to my mind from deep inside , I do not know how to express myself . Tula & gayekela khup khup Shubhechhya. Tumhi doghi aashah baharat raha, I am always there to clap for you .Sorry , I still have to learn Marathi typing . 🍀🌿🍀🌿
एका संस्मरणीय कार्यक्रमाचे छान वृत्तांकन.
जे.के.मीडिया व नॅशनल लायब्ररीने सुप्रसिद्ध बालसाहित्यिक
श्री.एकनाथ आव्हाड सरांना मिळालेल्या साहित्य
अकादमी पुरस्काराबद्दल जो सत्कार सोहळा घडवून
आणला तो कार्यक्रम कायम स्मरणात राहील.
या दोन्ही संस्थांसह डॉ.निशिगंधा वाड यांनी आपल्या
ओघवत्या शैलीतून एकनाथ दादांचं केलेलं कौतुक
खूपच अभिमानास्पद गौरवास्पद असं आहे.आदरणीय
विजयाताई वाड यांच्या चनिया मनिया बोर या गाण्याची
मला आठवण झाली व त्यातून माझ्या हातून श्री.एकनाथ
सरांसाठी काव्यमय सन्मानपत्र तयार झालं.ते माय लेकीचं
गाणं प्रत्यक्ष निशिगंधा ताईच्या उपस्थितीत सादर करताना
मला खूपच आनंद झाला.त्यासाठी ज्योती ताईंना मनापासून
धन्यवाद देतो व प्रिय एकनाथ आव्हाड सरांचं पुनश्च
अभिनंदन करतो.ही छान बातमी वाचकांपर्यंत पोहोचवल्या
बद्दल न्यूज स्टोरी टुडेला मनापासून धन्यवाद 🙏