Tuesday, September 16, 2025
Homeसाहित्यवाचक लिहितात…

वाचक लिहितात…

नमस्कार मंडळी.
गेल्या आठवड्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.
— संपादक

१. वृत्तपत्र लेखकांच्या आंदोलनास पाठिंबा आहे. लवकरच न्याय मिळेल अशी आशा वाटते.

– माधव अटकोरे.ज्येष्ठ पत्रकार, नांदेड.

२. दुर्मीळ पुस्तके :१३ कागदी होड्या – बा भ बोरकर या लेखावरील अभिप्राय

बा.भ. बोरकर यांना आपण कवी म्हणून ओळखतो. त्यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी लघु निबंधही लिहिलेले दिसते. 1930 म्हणजे सुमारे शंभर वर्षांपूर्वीचा काळ नजरेसमोर आणा. त्या काळातील हे लघु निबंध अतिशय मनोज्ञ आणि काही संस्कार करू पाहणारे आहेत. सामान्यपणे प्रचलित मानवी मूल्यांविषयी हे निबंध भाष्य करतात. कागदी होड्या, जगावे कसे यासारखे निबंध वाचताना गंमत वाटते. ‘गोल्ड फ्लेक हा निबंधही मजेशीर वाटला. बोरकर यांना सिगारेट ओढणे आवडायचे; त्याचे दर्शन कधीतरी त्यांच्या कवितातून (उदाहरणार्थ ‘जपानी रमलाची रात’ घडते.) त्यांचे समकालीन अनंत काणेकर हे तर प्रस्तावना लिहिण्यासाठी प्रसिद्ध! त्यामुळे त्यांची प्रस्तावना या संग्रहाला असावी हे ओघाने आलेच… तत्कालीन लघुकथा आणि लघुनिबंध हे परस्परांशी जुळवून घेणारे प्रकार असावेत असे वाटते. आज लघु निबंधाचे स्वरूप बदलून ते हळूहळू ललित लेख/ललित चिंतन असे झाले आहे. (विदर्भात ललितबंध) रिपोर्ताज हे सुद्धा त्याचे एक विस्तारित रूप…
आजचा ललित लेखकांना आपल्या मुळांचा शोध घेताना हा संग्रह निश्चितच उपयुक्त ठरेल 🙏
श्री प्रल्हाद जाधव, माजी संचालक (माहिती)

बा. भ. बोरकरांच्या कागदी होड्या पुस्तकाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे…
लहान सान सोन्याच पान…
श्री सु अ धारव, माजी उपसंचालक (माहिती)

माझा आवडता विषय प्राचीन भारतीय इतिहास व संस्कृती आहे. मात्र या निमित्ताने साहित्याची तोंड ओळख होत आहे.
श्री भिक्कू महेंद्र कौसल, माजी संचालक (माहिती)

छान👍
श्री अजय भगवंत देशमुख

३. सोशल मिडीया: सजगता-आवश्यक…..
अतिशय महत्त्वाच्या विषय. याबाबत सजग राहणे खूप आवश्यक.

– संगीता मालकर. कोपरगाव.

४. निसर्गाचा रंगोत्सव.. विलोभनीय., कामाख्या शक्तिपीठ…छान.

शिवानी गोंडाळ. मुंबई

५. भिडे वाडा संदर्भात
अतिशय चांगला निर्णय म्हणावा.

संगीता सातोस्कर. मुंबई.

६. पौर्णिमा शेन्डे यानी लिहीलेली लक्ष्मी रूपेन ह्या लेखाच्या प्रतिक्रिया…

कथा खूप आवडली. भावनेला भिडणारी कथा…खूप छान.

— माधव अटकोरे. नांदेड.

खूप छान लेख लिहिला आहेस. पण खरा की काल्पनिक. रंगीत फोटो तुझ्याच आईचा आहे का ?
कुतुहल म्हणून विचारतेय हं
— दशपुत्रे मॅडम

तु आपल्या आईबद्दल लिहिलेला लेख खुपच भावनांत्मक आहे गं.. आई चे पूर्ण चित्रच डोळ्यासमोर उभे राहीले ..मन कसं भरून आलं गं…खरंच ! अगदी साध्या, सोप्या शब्दांत तु व्यक्त केलंस ..
सुषमा हबीब

माई, तू आईचं वर्णन आणि तुझ्या मनातल्या भावना अतिशय योग्य पद्धतीने मांडलेल्या आहेत. मलाही त्या पटल्या, आवडल्या, भावल्या. छान लेख लिहिला. आईचे आशीर्वाद असेच तुझ्या पाठीवर राहु दे 👍🏻🌹
वसंत संख्ये.

पुर्णिमा, तू आपल्या आईबद्दल लेख खूपच सुंदर लिहिला आहे.आई माझ्या कडे आली की बरे वाटत असे.
पुर्णिमा, आईबद्दल वर्णन वाचून खूपच भारावून गेले.
रंजना रेणाविकर👌💐🙏🙏

पूर्णिमा आईविषयी खूप सुंदर लिहीलं आहेस. फोटोवरून तू आईसारखी दिसतेस असं वाटतं. खूप छान👌👌👌
आईच्या आठवणी प्रवाही आणि प्रभावी भाषेत लिहिल्या आहेस.
जयश्री भिसे.

खुपच छान लिहिलय आईबद्दल. आईबद्दल सारखीच दिसतेस तूं आणि आईचा वरदहस्त तुझ्यावर आहेच. त्यामुळे ती सतत तुझ्यासोबत आहे. 🌹🌹🌹
स्वाती चित्तरवार.

किती सुंदर लिहिलंयस ग
मुग्धा मोडक.

पूर्णिमा, भारीच, मलाही माझ्या आईची आठवण आली ग 🥰🥰
लीना कुरतडकर.

खुप छान…
छाया अंगडी

वाचले मी फेसबुक वर, खुप छान लिहिले आहेस. 🙏🌸 मला वांद्रे येथे यायचे म्हणजे खुप आकर्षण असायचे. आई खुप माया करित असे. शेंगदाणे, तूप साखर चपाती, झोपाळा😁 मज्जा असायची. बस मधून हनुमान मंदिर दिसले की खुप आनंद व्हायचा. तुम्ही सगळे असायचे, एवढे छान होते दिवस. आई दादांची खूप आठवण येते.😔
तनूजा गोखले.

पूर्णिमा छान लिहिले आहेस 👌👌
माला हबीब.

Article Khuup Sundaaaar Pournima tai 🥰
Mami ekdum dolyasamor aali
Mama, Mami chi athavan karun dilis
Thanks for sharing
राजू कोल्हापूरे.

🙏आई सारखे दैवत जगतावर नाही. आईचा तो स्पर्श, तो ओलावा, ती माया, ते गोड शब्द, समजावून सांगणं…,.आईचे हे
कर्ज कधीच फेडू शकत नाही.
🌹🤗 किती प्रेमळपणाने पूर्णिमा तू लिहिले आहेस. खुप छान.
भारती.

— टीम एनएसटी

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं