अलगद उतरला सोन कवडसा
श्रावण धारा मेघा तुन
नाचूं लागले मोर केतकी
रंग मोहरले रेशमा तुन
शिर शीर शीर शिर शिरला वारा
रूपेरी त्या पंखा तुन
ऊबदार ही शीळ घालीत
राघु फिरला राना तुन
घड़ घड़ घड़ घड़ झाड़ हालले
हलला पक्षी देठा तुन
थर थर थर थर थर अंग मोहरले
ऊसवले हिरव्या पाना तून
झर झर झर झर रुद्र मंथन ते
तलम सोन शलाक्या तुंन
सा रे ग म सरगम उठती
वृंदावनी त्या वेणु तुन
बहरे रंग रंगीत बहार हा
सृजना च्या कर्ण कोषा तुन
कोश्यातुन तृप्त झाले
निसटले मोती चोची तुन
हर हर हर हरदी नी अमृत वाणी
स्त्रवते पाणी झर्या तुन
तड तड तड शब्द पाझरे
वागेश्वरी च्या लेखणी तुन
– रचना : प्रो डॉ गंगाधर उर्फ प्रवीण जोशी,
नसलापुर, कर्नाटक.