डाॅक्टर
जीवीत रक्षीणारा तू देवदूत आहेस ..
यमदूतासही परतवीणारे तू श्रद्धास्थान आहेस.. घटनास्थळी आक्रोशांना आवर घालणारा तू श्वास आहेस
दंगल फसल आटोक्यात आणणारा तू विश्वास आहेस.. अहर्निश राबतोस तू रुग्णसेवा देण्यास ..
अविरत कार्य करीत राहाणारा तू पुण्यात्मा आहेस ..
होय डाॅक्टर ..
तुम्ही वंदनीय अन् ह्या धरणीवर खूप खास आहात ..
तुमच्या नुसत्या भेटीने तुमच्या एकाच वाक्याने ..
अर्धाअधीक आजार दूर पळतो तुमच्या एका स्मिताने ..
नाही लेखी तुमच्या कोणी अमीर गरीब..
जातपात न् धर्माचीही नाही ठेवत तुम्ही आब ..
सारेच रुग्ण तुमच्याकरीता एक श्वास ..
त्यांचे रक्षण करणे हाच असतो तुमचा ध्यास ..
रुग्णसेवा असे तुम्हा कुटुंब सेवा ..
देती जेव्हा रुग्णमुक्त दुवा तुम्हा ..
लपविता नेत्री तुम्ही अश्रुंचा ठेवा ..
देवदूतच तुम्ही ..
अग्रस्थानी जीवनी तुमच्या, तुमची रुग्णसेवा ..
– रचना : नेहा हजारे.
डॉक्टर म्हणजे देव आहे
डॉक्टर नेमके कोण आहे ?
डॉक्टर देव निर्मित धन्वंतरी आहे.
डॉक्टर हा दिलासा आहे.
प्रथम धर्म हा उपचार आहे.
कुठली जात पात धर्म ही नाही.
म्हणून सांगते डॉक्टर हा देव आहे.
डॉक्टर सुखदुख: साक्षात
देव म्हणून पाठीशी आहे
डॉक्टर खंबीर करणारा आहे
काही होत नाही तू स्ट्रॉंग आहे म्हणणारा.
डॉक्टर मातेप्रमाणे करणार
सगळं काही ठीक होईल
ऑल इज वेल म्हणणारा
डॉक्टर हा देव आहे.
डॉक्टर आजारावर रामबाण उपचार करणारा
डॉक्टर बहिणीप्रमाणे समजून घेणारा.
डॉक्टर दयेचा सागर आहे
डॉक्टर हा विठ्ठल आहे
डॉक्टर समाज सेवक आहे
म्हणून सांगते डॉक्टर हा देव आहे
रात्री-बेरात्री तातडीने उपचारासाठी धावून येणारा
डॉक्टर जणू जनतेचा हनुमान आहे
औषधांच्या स्वरूपात संजीवनी बुटी देणारा
कधीही धावून येणारा तो खरा मित्र
धन्वंतरी तोच आहे जगन्नाथ तोच आहे
तोच आहे एकमेव दिलासा.
म्हणून सांगते डॉक्टर हा धन्वंतरी आहे.
– रचना : वर्षा वासुदेव भावसार.
देव आहे डॉक्टरात
माहीत नाही मला
देव कधी भेटेल का
खूप ऐकून आहे की,
देव आहे प्रत्येक वस्तूत
देव आहे चराचरात
पण खरा देव आहे डॉक्टर
आजच्या घडीला
किती बळी गेले
कित्येकांच्या गेल्या नोकऱ्या
कित्येक आले रस्त्यावर
उपासमारीने गेले बळी
गेले हरवून माणूसपण
नाही बदलले डॉक्टर
नाही बंद झाले दवाखाने
देव त्यांच्या कर्तव्यात
त्यांना पण आहे घरदार
पण कर्तव्यात कुठेही
कमी न पडता
मानवसेवा हीच ईश्वर सेवा
मानून करत आहेत सेवा
डॉक्टर नावाच्या देवाला
आहे माझा नमस्कार
– रचना : वाणी केरकलमट्टी
🙏🙏🙏🙏🙏🙏
देवदुत पृथ्वीवरचा 🙏
कुठून आला हा महाभयंकर कोरोना
त्याला येत च नाही बघा कोणाची करूणा
क्षणात होत्याच नव्हते केले जग हे
करूणा कोणाला भाकावी कळेना
मंदिराचे दरवाजे झाले बंद
नाही आता कोठेही घंटा नाद
कठीण काळी हा देव
आला पीपीई किट घालून
विचित्र आजार हा
घरातले नसते जवळ कोणी
डाॅक्टरच हा देवदूत झाला
आमचा बाबा आणि आई
घरच्या मायेने तोच काळजी घेई
पीपीई किट मधल्या वेदना फक्त
डाॅक्टर व नर्सच अनुभवी
कार्यात त्यांच्या नाही कुठेही कसुर
देवदुताच्या ह्या काय मोल
नाही लोकांना कळत
स्वतः च्या चुकांचं खापर
मारतात डाॅक्टरच्या माथी
कारण नसताना मारझोड
डाॅक्टरच्या सेवेचा अपमान
जणू नात्यातील ह्यांच्या नसावा
कोणी डाॅक्टर
त्यांच्या आयुष्यातील दुःख
नाही कळत कोणाला
आईबाबाची भुमिका
आपल्यासाठी करताना
त्यांच्या पोटच्या लेकरांनाही
नाही भेटत कित्येक दिवस
अरे माणसा, माणसा सारखा हो
स्वतः साठी नाही तर कमीत कमी
डाॅक्टरच्या जीवासाठी तरी
पाळ सुरक्षित अंतर लाव मास्क
ह्या करोनाला करा हद्दपार
डाॅक्टर हा देवदुत झाला
तरी त्याला ही आहे परिवार
त्यांचा हि जीव तळमळतो
भावना त्याच्या समजून घ्या
देवदूत होऊन आलेल्या
तुला व तुझ्या कार्याला
शतशः कोटी कोटी प्रणाम. 🙏

– रचना : सौ.मंदा विजय शेटे. चेंबूर