Homeसेवारेषांमधली भाषा : २१

रेषांमधली भाषा : २१

“कधीतरी”

मंडळी,
“कधीतरी” ही कविता मुंबईमध्ये राहणारे चित्रकार जितेश कल्लत यांनी काढलेल्या एका अप्रोप्रिएशन आर्ट, अर्थातच मराठीत त्याला आपण ग्रहणात्मक कला म्हणतो, तिचा वापर करून काढलेल्या एका अनामिक चित्रावर केलेली आहे.

अप्रोप्रिएशन आर्ट म्हणजे इतरांच्या कला किंवा प्रतिमा वापरून त्यांना नवीन संदर्भ किंवा अर्थ देणारी कला. या अनामिक चित्राकडे जेव्हा तुम्ही बघाल, तेव्हा तुम्हाला जाणवेल की जितेश कल्लत यांनी प्रसिद्ध जपानी चित्रकार हाकूसाई यांनी काढलेल्या द व्हेव नावाच्या चित्रातले संदर्भ या चित्राच्या डाव्या बाजूला खाली वापरले आहेत. उजव्या बाजूला ढगांच्या सारखा दिसणारा शर्ट आपल्याला दिसतो आहे, जो रेने मॅगरिथ यांनी काढलेल्या सरियलिझम चित्रशैलीतील आहे. मध्यवर्ती जो माणूस दिसतोय त्याच्या डोक्यामध्ये जो काही सगळा कोलाहल चाललाय, माणसांची गर्दी, गाड्या, ओघळणारी शाई, तो त्यांच्या स्वतःच्याच रिक्षापॉलिस या चित्रातला एक छोटासा भाग आहे. आणि हा गोंधळ वेगवेगळ्या प्रतिमा वापरून आणि त्यांच्यावर ओघळणाऱ्या शाईला किंवा पावसाच्या थेंबांचा कल्पकतेने वापर करून जोडला आहे.

त्यामुळेच *“कधीतरी”* ही कविता जीवनातला गोंधळ आणि मनातील मुक्ती यामध्ये  संभ्रमात असणाऱ्या विचारांना व्यक्त करणारी कविता आहे. या चित्रातील बरेचसे संदर्भ तुम्हाला या कवितेत नक्की जाणवतील अशी मला आशा आहे. यूट्यूब चॅनलची लिंक 👇 इथे खाली देत आहे.

मला आशा आहे की ही कविता तुम्हाला जरूर आवडेल. कविता आवडली तर जरूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र परिवाराबरोबर शेअर करा, धन्यवाद.

शैलेश देशपांडे

— लेखन : शैलेश देशपांडे. रिचमंड, अमेरिका.
— संपादन : देवेंद्र भुजबळ
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments