(नाते पती-पत्नीचे)
सप्तपदी दोघांची सर्वासमक्ष विवाहदिनी
सात वचने उमजली हळूहळू सहजीवनी
सितारे चमकणारी आवडे भारी यामिनी
सीमा नुरली आनंदा प्रेमळ आलिंगनी
सुलोचनाची मौन भाषा,सुचवी तोडगा
सूचना छोट्या कृतीतून देई सूज्ञ स्वामिनी
सेतू दोन तनामनातील मजबूत जाहला
सैनिकीबाणा सावरी घरकुला प्रतिदिनी
सोबतीने होती रौप्य-सुवर्ण-अमृत सोहळे
सौभाग्ये सौख्यभरे नांदता सौरभ-सौदामिनी
संसारी संगे संभाव्य संकटे संचित प्रारब्धाचे
सहाय्या उभी मागे माता कोल्हापूरवासिनी
चित्रित तो-चहाच्या कपावर,ती-कॉफीच्या
त्यास पहात तंद्रीत गाती राग – रागिणी
नाते पतीपत्नीचे अलौकिक,एकमेका पूरक
ऐसी अनुपम जोडी घालीत राहो मोहिनी
— रचना : विजया केळकर. नागपूर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
