Homeबातम्याकलाली मराठी शब्दकोशाची दुसरी आवृत्ती प्रकाशित

कलाली मराठी शब्दकोशाची दुसरी आवृत्ती प्रकाशित

कलाली भाषेतील प्राचार्य डॉ. रामदास चवरे यांनी तयार केलेल्या पहिल्या शब्दकोशाच्या दुसर्‍या आवृत्तीचे प्रकाशन मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर यांच्याहस्ते भाषा संचालनालय, राज्य मराठी विकास संस्था मुंबई व मराठी भाषा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथील बोली अभ्यासक कार्यशाळेत नुकतेच झाले.

यावेळी बोलताना डॉ. आवलगावकर म्हणाले की, “अलीकडे कित्येक भाषा नामशेष होण्याच्या वाटेवर असताना प्राचार्य डॉ. रामदास चवरे यांनी अथक परिश्रमातून कलाली मराठी शब्दकोश तयार केला. या शब्दकोशाने अभ्यासकांना नवीन वाट दाखविली.” यामुळे एक वेगळी संस्कृती तसेच जीवनमान, वाक्प्रचार, म्हणी, लोकगीते यांचे समृद्ध भांडार सिद्ध झाले.”

यावेळी व्यासपीठावर डॉ. प्रशांत बोकारे (कुलगुरू, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली), मा. अरुण गिते (भाषा संचालक, महाराष्ट्र राज्य), मा. डॉ. शामकांत देवरे (संचालक, राज्य मराठी विकास संस्था), मा. डॉ. सुबोध भांडारकर (कुलसचिव, मराठी भाषा विद्यापीठ) हे उपस्थित होते.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments