नमस्कार मंडळी.
आजपासून सुरू झालेल्या नवरात्रोत्सवाच्या आपणास मनःपूर्वक शुभेच्छा. 💐
नवरात्रीच्या मुहूर्तावर दोन छान हॅटट्रिक घडून आल्या आहेत. पहिली म्हणजे ‘न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन्स’ ने प्रकाशित केलेल्या माझी जडणघडण या पुस्तकाची दखल महाराष्ट्र टाइम्स आणि लोकसत्ता या वृत्तपत्रांनी घेतली आहे. तर पंख जिद्दीचे या पुस्तकाचे परीक्षण सकाळ वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहे.



या दोन्ही आत्मचरित्राच्या लेखिका अनुक्रमे राधिका भांडारकर आणि प्रतीक्षा तोंडवळकर तर प्रकाशिका सौ अलका भुजबळ आहेत ! अशा प्रकारे नवरात्रोत्सवात या तीन देवींनी आपल्या कर्तुत्वाची झलक दाखविली आहे.

या वृत्तपत्रातील मजकुरावर आधारित प्राप्त झालेल्या काही निवडक प्रतिक्रिया पुढे देत आहे.
1) Congratulations Dear Sir, Alka Vahini n her team of Authors.💐
–– Ranjit Chandel. Yeotmal
2) नवरात्रौत्सवात आपल्यातल्या नारीशक्तीचा उदोउदो झालायं याबद्दल सौ.अलका भुजबळ, राधिका भांडारकर आणि प्रतिक्षा तोंडवळकर या तिन्ही प्रतिभावान नारींचं अभिनंदन. 👍💐💐💐
–– वीणा गावडे. मुंबई
3) नवरात्रीतील तीन नवदुर्गांना सलाम !
लेखिका राधिका भांडारकर, प्रतीक्षा तोंडवळकर आणि या साहित्यकृतींना समर्थ व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन्सच्या प्रकाशिका सौ. अलका भुजबळ या तिन्ही कर्तृत्ववान नवदुर्गांचे मनःपूर्वक अभिनंदन!
तसेच, मराठी साहित्यविश्वातील या उल्लेखनीय साहित्यकृतींची दखल घेणाऱ्या महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता आणि सकाळ या वृत्तपत्रांचे आणि साहित्याला प्रोत्साहन देणाऱ्या संपूर्ण टीम ‘न्यूज स्टोरी टुडे’चे मनःपूर्वक अभिनंदन व आभार !
नवरात्रीच्या मंगल पर्वात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या या तिन्ही नवदुर्गांना हार्दिक शुभेच्छा !
–– छायाचित्रकार विजय होकर्णे. नांदेड
4) सौ. अलका भुजबळ वहिनींचे हार्दिक अभिनंदन.
— विजय पवार. पुणे
या तिघींचे हार्दिक अभिनंदन तर या तिन्ही वृत्तपत्रांचे मनःपूर्वक आभार.
आपली स्नेहांकित
— टीम न्यूज स्टोरी टुडे. ☎️ +91 9869484800
