Homeबातम्या"कोवळं ऊन" : पुरस्कार जाहीर

“कोवळं ऊन” : पुरस्कार जाहीर

गझलनिष्ठ संस्थेने १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२५ या दरम्यान प्रकाशित झालेल्या उत्कृष्ट साहित्य कृतींसाठी नुकतेच पुरस्कार जाहीर केले आहेत.

या पुरस्कारांमध्ये सिंगापूर स्थित लेखिका नीला बर्वे यांनी लिहिलेल्या आणि ‘न्यूज स्टोरी टुडे’ ने प्रकाशित केलेल्या “कोवळं ऊन” या कथा संग्रहाचा समावेश आहे. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि ग्रंथभेट असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

या पुरस्कारारांचे वितरण एका मोठ्या कार्यक्रमात करण्याचे ठरविण्यात आले होते. परंतु देशाच्या सद्यःस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करणे उचित वाटत नसून उपस्थितांचा / आयोजकांचा वाहन आणि इतर खर्च याला प्रतिबंध बसावा म्हणून हे पुरस्कार लवकरच पुरस्कार विजेत्यांना टपालाद्वारे पाठविण्यात येणार आहे, असे गझलनिष्ठ संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष प्रा. सुनंदा पाटील यांनी कळविले आहे.

हा पुरस्कार मिळाल्याबद्दल ‘न्यूज स्टोरी टुडे’ च्या नियमित लेखिका नीला बर्वे यांचे न्यूज स्टोरी टुडे परिवारातर्फे मनःपूर्वक अभिनंदन.

— टीम एन एस टी. ☎️ +919869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments