Homeसाहित्यदेश माझा, मी देशाचा….

देश माझा, मी देशाचा….

बालपणी आजी आजोबा सांगत असती गोष्टी छान
बिरबल बादशहा,इसापनीती ऐकत होतो देऊन कान
शिकवण सारी त्या कथांची रुजली होती खोल मनात
धडे मिळाले आपोआपच वागावे ते कसे जगात

शाळेमध्ये मजाचमजा मित्रमैत्रिणी नव्या नव्या
धमाल मस्ती करता करता मारही लागे कधी खावा
संस्कार रुजला एक मनात खाऊ खेळणी घेता वाटून
करत रहा कुठलेही काम एकट्यापेक्षा सर्व मिळून

स्काऊटगाईड,एन् सी सीचा विसर आम्हां कसा पडे
शिस्त,सैनिकी शिक्षण घेता देशासाठी हात पुढे
काॅलेजलाईफ एन्जाॅय करता आठवण येई त्या कट्टयाची
ओळख होती त-हेत-हेच्या स्वभावांची नि विचारांची

वादविवाद नि चर्चा करतां समजत गेल्या विचारधारा
त्यांतून आपुला मार्ग कोणता याचे आले भान जरा
गणेशोत्सवी ऐकत आलो विचार संतमहंतांचे
तसेच झालो सावध ऐकून जीवन आपुल्या सैनिकांचे

देश माझा, मी देशाचा, भारतीय मी हाच विचार
अभिमानाने उभा ताठ मी करण्या जगती या संचार
मी, माझे सोडून द्यावे मिळून सारे करुया काम
देश, समाजासाठी श्रमूया विसरून.

स्वाती दामले

— रचना : स्वाती दामले. बदलापुर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments