किशोर कुमार यांचा आज जन्म दिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांना वाहिलेली. ही शब्दांजली….
— संपादक
अष्टपैलू व्यक्तिमत्व
अद्वितीय कलाकार
नव्या जुन्या युगाचा
प्रिय किशोर कुमार
चित्र सृष्टीस वरदान
सर्व क्षेत्र मुक्तविहार
अमर केली गायकी
गीते ती सदा बहार
कैक वळणे आयुष्य
बदला करे स्विकार
जाईलं तिथे वर्चस्व
गाजे नित अधिकार
संगिता वर थिरकणे
नवा ट्रेण्ड नव प्रकार
याडलिंगचा बादशहा
तरूणा मौक्तीक हार
अपयशाने खचले ना
स्मीतहास्ये पचवेहार
तीन दशके गाजवली
अजरामर ते गीतकार
खास शैलीत सजली
गाणी देई संगीतकार
सिध्द हस्त दिग्दर्शक
निर्माता पटकथाकार
बंधू थोर सुस्मरणीय
अनुप अशोककुमार
पार्श्वगायन जयासाठी
कैक बनले सुपरस्टार
लग्नेही गाजली चार
अर्धवट राहिले संसार
विक्षिप्त स्वभाव नडे
सोसले कितीक प्रहार
अल्पायुषी लाभे जरी
किर्ती आयु ती अपार
खंडव्या भेटीस जाता
गोष्ट सांगे कडे कपार

— रचना : हेमंत मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
