‘देखणी ती पाऊले’ या श्री महादेव गोविंद रानडे यांच्या स्वप्नातील स्वयंसेवी संस्थांच्या समूहातर्फे मुंबईतील बोरिवली येथील “सुविद्या” प्रसारक संघाच्या सभागृहात ‘स्वयंसेवी संस्थांचे उज्ज्वल भविष्य’ या विषयावर नुकत्याच एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. डॉ. महेश अभ्यंकर यांच्या संकल्पनेतून आणि श्री. रानडे यांच्या उमेदीतून साकारलेल्या या कार्यशाळेत विविध तज्ज्ञांनी स्वयंसेवी संस्थांच्या प्रभावी वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. प्रारंभी श्री. महादेव रानडे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली.
पहिल्या सत्रात पुण्यातील ‘आपले घर’चे श्री. विजय फाळणीकर यांनी ध्येय निश्चित करताना आवश्यक सर्व बाबींचा सांगोपांग विचार करून ध्येय गाठण्याचे महत्त्व स्पष्ट केले.
‘सेवा सहयोग’ संस्थेचे श्री. किशोर मोघे यांनी स्वयंसेवी संस्थांना सीएसआर निधी मिळविण्याची प्रक्रिया व त्यातील बारकावे प्रभावीपणे विशद केले.
डॉ. कविता रेगे यांनी व्यवस्थापन कौशल्यावर मार्गदर्शन केले.
भोजनानंतरच्या दुसऱ्या सत्रात श्री. विवेक माणगावकर यांनी मनुष्यबळ बांधणी, श्री.श्रीकांत जोशी यांनी ‘निधी संकलन : एक कला आणि शास्त्र’, तर डॉ. उत्तरा गोगटे यांनी ‘नेटवर्किंग व मार्केटिंग काळाची गरज’ या विषयावर मार्गदर्शन केले. उपस्थितांनी तज्ज्ञांना विविध विषयांवर प्रश्न विचारून समाधानकारक उत्तरे मिळवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. महेश अभ्यंकर यांनी केले.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
