शंभरावे अ.भा.मराठी साहित्य संमेलन जानेवारी 2027 ला पुणे येथे होणार आहे. या निमित्ताने विविध ठिकाणी 99 नांदी संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. या अनुषंगाने म.सा प. अध्यक्ष योगेश सोमण यांच्या अध्यक्षतेखाली विविध साहित्य संस्थाची सभा नुकतीच पुणे येथील म.सा.प. कार्यालयात घेण्यात आली.
नांदी संमेलनाचा एक भाग म़्हणून “आम्ही सिद्ध लेखिका” या महिलांच्या साहित्य संस्थेला राज्यस्तरीय कथालेखिका संमेलनाचे नियोजन करण्याची संधी मसाप कडून देण्यात आली आहे. म्हणून एक नोव्हेंबर २०२६ रोजी एक दिवसीय कथालेखिका संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे.


या संमेलनात संस्थेच्या विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मध्यप्रदेश, मुंबई, ठाणे, पुणे, गोवा येथून दोनशे, सव्वादोनशे कथालेखिका सहभागी होणार आहेत.
तसेच महाराष्ट्रातील विविध मान्यवर ज्येष्ठ कथालेखिकांना आमंत्रित करून त्या़ंचा सन्मान करण्यात येणार आहे अशी माहिती संस्था अध्यक्ष प्रा.पद्मा हुशिंग या़ंनी दिली.
यावेळी मराठवाडा विभाग प्रमुख प्रा. स्नेहल पाठक आम्ही सिद्ध लेखिका पुणे शाखा प्रमुख मा. चारूशिला बिवरे आणि कार्यकारणी सदस्य उपस्थित होत्या.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
