नागपूर येथील महिला महाविद्यालयाच्या मराठी भाषा विभाग प्रा डॉ विजया राऊत यांनी लिहिलेल्या, देवेंद्र भुजबळ यांनी संपादित केलेल्या आणि न्यूज स्टोरी टुडे ने प्रकाशित केलेल्या “महानुभाव विचार दर्शन” या पुस्तकाचे प्रकाशन नागपूर येथील श्रीकृष्ण सेवा मंडळात श्रीकृष्ण अवतार दिन साजरा करण्यात आला, त्यावेळी प्रकाशन करण्यात आले.
या पुस्तकाबद्दल बोलताना आदरणीय नितीन दादाजी म्हणाले की, या पुस्तकामध्ये एकूण १८ प्रकरणे आहेत. प्रत्येक प्रकरणाचा विषय वेगवेगळा असून महानुभाव पंथातील सर्व हेतू आणि उद्देश या पुस्तकामध्ये साध्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक घरी हे पुस्तक असणे गरजेचे आहे, असे सुद्धा त्यांनी आपल्या विवेचनात स्पष्ट केले.

आदरणीय मोठेबाबा; सैंघराजशास्त्री नायंबासबाबा म्हणाले की, या राऊत ताईनी या पुस्तकाचे लिखाण करण्याकरिता अनेक ग्रंथांचा वापर केलेला आहे. या पुस्तकातील प्रत्येक विषय हा वेगवेगळा आहे असे सांगून त्यांनी पुस्तकाविषयी गौरवोद्गार काढले.
मुकुंदराज शास्त्री आणि अनेक मान्यवर या पुस्तक प्रकाशनाला उपस्थित होते. सर्वांनी पुस्तकाची खूप प्रशंसा केली.
विशेष म्हणजे हे पुस्तक न्यूज स्टोरी टुडे पोर्टल वर लेखमाला स्वरुपात प्रसिद्ध झाले. त्यानंतर ते पुस्तक रुपात प्रकाशित झाले आहे.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
