तक्रार करणे असते व्यर्थ
संघर्षातच असे खरा अर्थ
सामर्थ्य होते तेव्हा सिध्द
जोडीला असते जेव्हा जिद्द
अथक प्रयत्नांची धरतो कास
जिंकण्याची तेव्हा असते आस
प्रामाणिक काम ईश्वर भक्ती
सोबतीला दृढ इच्छाशक्ती
जरी सतावेल परिस्थिती
संकटात शोध अदृश्य संधी
जेव्हा जाणवेल मानसिक त्रास
व्यक्त हो कोणापाशी हमखास
यश अपयशाची नको भीती
नशीब असते आपल्या हाती
नसेल जेव्हा कोणाची साथ
परमेश्वरावर ठेव विश्वास
असता श्रद्धा व सबुरी
होतील सर्व इच्छा पुरी
स्वच्छ असते मनुष्याची नीती
अखंड झळकते त्याची किर्ती
ज्याची असेल निस्वार्थ वृत्ती
चांगल्या कर्माची मिळते प्रचिती
कष्टाच्या पैशाची असते हमी
सुखाची येथे नसते कमी
तिचे रूप असते लक्ष्मी
सर्व जगाची ती स्वामिनी
देऊ नको स्वतःला दोष
तेवत ठेव आशेची ज्योत
दे तुझ्या स्वप्नांना पंख
जप अस्तित्वाचा सुगंध
जे देतील आज तुला घाव
तेच करतील शुभेच्छांचा वर्षाव.
प्रत्येक परिस्थितीचा करु स्वीकार
परमेश्वराचे मानू सदैव आभार
परमेश्वराचे मानू सदैव आभार.

— रचना : रश्मी हेडे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800.
