आजच्या तरुण पिढीबद्दल, विशेषतः ‘Gen Z’बद्दल, अनेकदा कौटुंबिक मूल्ये कमी होत असल्याची चर्चा केली जाते. मात्र सर्वेशने, आई शिवानी अभंग हिच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त राबविलेल्या एका अनोख्या उपक्रमाने या गैरसमजुतीला सुंदर उत्तर दिले.
आईचा ५० वा वाढदिवस केवळ पार्टी, भेटवस्तू किंवा मनोरंजनापुरता मर्यादित न ठेवता, कुटुंबीय आणि मित्रांच्या आरोग्याची काळजी घेऊन साजरा करण्याची कल्पना सर्वेशने मांडली. त्यानुसार नवी मुंबईतील वाशी येथील श्री रामकृष्ण नेत्रालयाच्या सहकार्याने ‘Family Health & Wellness Gathering’ आयोजित करण्यात आले. यावेळी उपस्थित कुटुंबीय व मित्रांसाठी मोफत नेत्र तपासणी आणि दंत तपासणीसह प्रतिबंधात्मक आरोग्याबाबत जनजागृती करण्यात आली.
या आगळ्यावेगळ्या सोहळ्याला नगरसेविका अंजली वाळुंज, माजी नगरसेविका सौ. शिल्पा प्रकाश मोरे आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ. अमरजा चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून उपक्रमाचे कौतुक केले.

“आईने आयुष्यभर कुटुंबाची काळजी घेतली; तिच्या विशेष दिवशी आपण इतरांच्या आरोग्याची काळजी घेऊया,” हा या उपक्रमामागील साधा पण प्रभावी विचार आहे, असे सर्वेशने यावेळी बोलताना सांगितले.

शिवानी अभंग यांचा ५०वा वाढदिवस त्यामुळे केवळ एक कौटुंबिक सोहळा न राहता ‘Celebration with a Purpose’ ठरला. डॉ. नितीन देशपांडे (श्री रामकृष्ण नेत्रालय) आणि FMR व Implantology Specialist डॉ. शुद्धोधन गायकवाड (लोमा डेंटल) यांच्या सहकार्याने विशेष हे ‘Family Health & Wellness Gathering’ आयोजित करण्यात आले.

आजच्या पिढीला कौटुंबिक मूल्ये नाहीत असे म्हणण्याआधी सर्वेश सारख्या तरुणांकडे पाहण्याची गरज आहे. कदाचित मूल्ये बदललेली नाहीत—ती व्यक्त करण्याची पद्धत बदलली आहे.
‘Happy Birthday’ ते ‘Healthy Birthday’

वाढदिवस आणि कौटुंबिक आनंदाचे क्षण जर आरोग्य, जनजागृती आणि सामाजिक बांधिलकिशी जोडले गेले, तर प्रत्येक celebration एखाद्या सकारात्मक चळवळीची सुरुवात ठरू शकते.
सर्वेशच्या आईला “न्यूज स्टोरी टुडे” परिवारातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

— लेखन : योगेश वालावलकर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

Gen z ही मुलगी गमावलेली भरकटलेली पिढी नाही हे सिद्ध करणारे एक खूपच छान काम सर्वेश अभंग यांनी केले आहे. आपली आई शिवानी अभंग यांच्या ५० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने उपस्थित सर्व पाहुण्यांना मोफत नेत्र आणि दंतचिकित्सेचे आयोजन केले.
अतिशय अभिनव आणि उपयुक्त असं हे आयोजन केल्याबद्दल सर्वेश अभंग यांचे खूप कौतुक वाटते.
त्यांच्या मातोश्री शिवानी अभंग यांना वाढदिवसाच्या खूप सार्या सप्रेम शुभेच्छा.