चांदोबा चांदोबा दिसता कित्ती छान
पांढऱ्याशुभ्र दुधासारखे गोरे गोरे पान
कधी कधी दिसता गोल गरगरीत
कधी गायब होता कुठं, कुणास माहीत
चांदण्यांच्या पसाऱ्यात दिसता शोभून
टाळ्या वाजवे बाळ तुम्हास पाहून
ढगांसवे लपाछपी छान छान खेळता
ढगांच्या मऊ गादीवर किती छान झोपता
सकाळ होताच कुठं पळून जाता
रात्र होता एकाएकी कुठून उगवता
तुम्हास बघण्यात मजा येते फार
कधी कधी दिसत नाही दुःख होई फार

— रचना : आशारेखा, कोल्हापूर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
