कोहिनूर चित्रपट महोत्सव, डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात नुकताच पार पडला. या महोत्सवाला देशातील अनेक भागातून चित्रपट निर्माते व दिग्दर्शक उपस्थित होते.
महोत्सवाचे संचालक, श्री दिनकर जाधव यांनी सर्व प्रमुख पाहुण्यांचा आणि विजयी चित्रपट निर्मात्यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाला गीतकार सौ. सुरेखा गावंडे, डॉ. माधुरी रोडगे, अभिलाषा ठोंबळ, सौ. वैशाली आवटे हे प्रमुख पाहुणे लाभले होते.
मुख्याध्यापक पदावरून श्री अजय पाटील सर निवृत्त झाल्याबद्दल त्यांचा ह्या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. सर्वश्री शुभम वायंगणकर, यश खोत, अवंतिका बोरकर, स्नेहा वायंगणकर, राजेश गव्हाणे, गजेंद्र जाधव यांचे कार्यक्रमाला सहकार्य लाभले. महोत्सवाचे सहसंचालक श्री ओमकार जाधव यांनी कार्यक्रमाची धुरा सांभाळली.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
