Homeबातम्या"झेप"ची झेप !

“झेप”ची झेप !

निवृत्त माहिती संचालक तथा “न्यूज स्टोरी टुडे”चे संपादक श्री देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या – संपादित केलेल्या ‘झेप‘ या पुस्तकाचे गेल्या महिन्यात भूतानमध्ये प्रकाशन झाले.

या पुस्तकात सानपाडा जेष्ठ नागरिक संघाशी संबधित सर्वश्री फेस्कॉम चे अध्यक्ष श्री अण्णासाहेब टेकाळे, श्री राम काजरोलकर, श्री मारुती नाना कदम, श्री जे पी देसाई, सौ अलका भुजबळ यांच्या जीवन कथा असल्याबद्दल तसेच लेखकांमध्ये सानपाडा जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री मारुती विश्वासराव, श्री देवेंद्र भुजबळ आणि ग्राफिक डिझायनर श्री शैलेश कदम यांचा समावेश असल्याबद्दल या सर्वांचा “न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन”च्या वतीने सानपाडा जेष्ठ नागरिक संघाने नुकत्याच आयोजित केलेल्या आनंद मेळाव्यात सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी बोलताना “न्यूज स्टोरी टुडे” च्या प्रकाशिका सौ. अलका भुजबळ यांनी सांगितले की, आपल्या  प्रकाशन संस्थेतर्फे गेल्या 3 वर्षात 25 पुस्तके प्रकाशित केली असून त्यात 7 यशकथा संग्रह, 6 आत्मचरित्रे, 4 कविता प्रत्येकी 1 कथा संग्रह, कादंबरी, इंग्रजी नाटक, व्यक्तिचित्रण संग्रह आणि संकीर्ण अशी पुस्तके आहेत. विशेष म्हणजे त्यातील 3 पुस्तके परदेशस्थ लेखिकांची असून “झेप” हे रौप्यमहोत्सवी पुस्तक आहे.

यावेळी सर्व मान्यवरांनी ‘न्यूज स्टोरी टुडे’चे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी संघाचे सर्व पदाधिकारी आणि सर्व महिला व पुरुष ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सदाशिव रामचंद्र पोटे on पुस्तक परीक्षण
पूजा टंकसाळे सातारा on कोणी तरी असावे….