Friday, March 28, 2025
Homeसाहित्यगीत : बाई मी….

गीत : बाई मी….

संगीतकार ज्येष्ठ संगीतकार स्वर्गीय बाळ चावरे
गायिका : माधुरी जोगळेकर
कंपोजर : श्री विलास जोगळेकर..
अल्बम *“हे बंध रेशमी भावनांचे”*; *“हे बंध रेशमी भावनांचे”*
गीत शीर्षक  *“बाई मी खिडकीत बसले होते”*
वाट पाहुनी शिणले डोळे माझे …..
बाई मी खिडकीत बसले होते…..
चंद्राला त्या खूनवीत होते…
चंद्र पुनवेचा किती तेजस्वी दिसे…
येणार कधी ग साजन माझा…
वाट पाहुनी थकून गेले पुरते,
बाई मी खिडकीत बसले होते..1…

चंद्र ढगाआड लपून बसे…..
प्रियकर माझा जणू पदरा आड लपे..
गोजिरे चांदणे लखलखते कसे….
हळूच योवना …
मन रिझवीत असे…
इंतजार किती करणार सखे… …
वाट पाहुनी थकून गेले पुरते … ..
बाई मी खिडकीत बसले होते..2 ..

विरही हे मन माझे…
काहीच कळेना….
का हा दुरावा चैन पडेना जीवाला…
येणार कधी ग साजन माझा. ….
वाट पाहुनी थकूनी गेले पुरते…
वाट पाहुनी शिणले डोळे माझे…
बाई मी खिडकीत बसले होते. …
चंद्राला त्या खुणवीत होते…3..

पुढील व्हिडिओ मध्ये पाहू शकता.

— रचना : शांतीलाल ननवरे. मुंबई/बारामती.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments