नमस्कार मंडळी,
दर गुरुवारी आपण “स्नेहाची रेसिपी” वाचत असता. मात्र आज आपण “गप्पागोष्टी” चे देश विदेशात जवळपास १९०० कार्यक्रम केलेल्या जयंत ओक यांची लिंबाच्या लोणच्याची रेसिपी पाहू या.
आमच्या दूरदर्शनच्या DD Gold या व्हॉट्स ॲप समूहावर ही रेसिपी पाहूनच माझ्या तोंडाला पाणी सुटले. तसे मी फोन करून जयंता ला सांगितले. तर तो लगेच मला म्हणाला, घरी ये, तुला बरणीभर लोणचे देतो म्हणून.
एरव्ही गमती जमती करणारा जयंता, माझी गंमत तर करीत नाही ना ? असे मला क्षणभर वाटले. पण तसेही त्याला भेटायचेच होते म्हणून गेलो आणि काय सांगू, जयंता ने खरंच बरणी भरून लिंबाचे लोणचे मला दिले. बराच वेळ आम्ही गप्पागोष्टी केल्या.
दुसऱ्या दिवशी सकाळी, जयंताने दिलेली बरणी उघडून, त्याने बनविलेल्या लोणच्याची मी चव घेतली आणि असे वाटले, याने “गप्पागोष्टी” न करता बेडेकर लोणच्याच्या धर्तीवर “जयंत ओक यांची लोणची” जर सुरू केले असते तर, जयंता आज कुठच्या कुठे गेला असता ! तसा विचार अजूनही तो करू शकतो म्हणा. तर असो…

जयंता ची मुलगी सौ भक्ती हिने अतिशय भक्ती भावाने घेतलेली त्याची मुलाखत पाहू या आणि त्याच्या कडून ‘२५ शिट्ट्यांचं’ लिंबाचं लोणचं ! 🍋❤, तो कसे बनवतो ते पुढील लिंक वर क्लिक करून पाहू या.
आपल्याला ही रेसिपी कशी वाटली ? ते अवश्य कळवा.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800