Saturday, July 19, 2025
Homeसेवाजीवन म्हणजे काय ? - १७

जीवन म्हणजे काय ? – १७

नमस्कार मंडळी.
प्रत्येक शेतकऱ्याने मस्तीत, मज्जेत जीवन जगले पाहिजे. समोरच्याच्या मनात धडकी भरली पाहिजे. याचा नाद खुळा आहे, वाटेला जावून चालणार नाही. स्वतःच्या शेतीत रोज काम करतांना पाहून रिकामटेकडे, स्वयंघोषीत, स्वतःला पक्षांचे कार्यकर्ते, पुढारी समजतात त्यांना आपला हेवा वाटणारच.

आपण शेतीत गरज म्हणून करत असलेले काम इतरांच्या नजरेत भरतेय ते भरलच पाहिजे. आपल्या हातुन चांगले काम होतेय तेंव्हा त्यांची पर्वा काय म्हणून करायची ? कामातील आनंद पैशात मोजता येणार नाही. आपले विश्व वेगळे आहे. टीका करणाऱ्यांना किंमत का द्यायची ? परमेश्वराने मर्यादित दिलेले आयुष्य आनंदात, मस्तीत जगू या ! सर्वांबरोबर सलोख्याचे संबंध ठेवून हा जीवन प्रवास सुखमय करु या. समाजातील गरजूंना मदतीचा हात देवूया. जीवन जगणे ही एक कला असुन जो यशस्वी जीवन जगतो तो खरा कलावंत होय. “तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार” या बोधाप्रमाणे प्रयत्नवादाची कास धरुन विकास वादाकडे झेप घेणे म्हणजे जीवन !

काम करा हो काम करा !!
कामावरती प्रेम करा !!
काम करा आणि पोट भरा,
निसर्ग नियम हाची खरा !!
तेव्हा तुम्ही सुखाने जगा,
इतरांना सुखाने जगू द्या !!
जय जवान जय किसान !– 🤝–!!

विठ्ठल गव्हाणे

— लेखन : विठ्ठल गव्हाणे. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माध्यमभूषण याकूब सईद
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on आनंदी जीवनासाठी समतोल आवश्यक – देवेंद्र भुजबळ
कविता बिरारी on मम गाव राहिले दूर…..
प्राची उदय जोगळेकर on सांगा, कसं जगायचं ?