Saturday, May 17, 2025
Homeबातम्यानुतन फार्मसी : केसांवर संशोधनात यश

नुतन फार्मसी : केसांवर संशोधनात यश

“केसांच्या आरोग्याचे निदान करण्याचे उपक्रम” या वर संशोधन करून नुतन फार्मसीतील अंतिम व तृतीय वर्षातील बी.फार्मसीचे विद्यार्थी व प्राध्यापक यांनी ते भारतीय पेटंटला दाखल केले होते आणि नुकतेच ते भारतीय पेटंट कडून प्रसिद्ध झाले. हे उपकरण केसांच्या आरोग्याच्या विविध पॅरामीटर्सचे विश्लेषण करण्यासाठी डिझाइन केलेले आहे, जे केसांशी संबंधित आजारांचे निदान करण्यासाठी एक कार्यक्षम आणि अचूक पद्धत प्रदान करते.

संस्थेचे मुख्य कार्यकरी अधिकारी डॉ.अमोल पाटील व प्राचार्य डॉ नवनाथ कल्याने यांनी प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या कामगिरीबद्दल अभिमान व्यक्त करत म्हटले आहे की, “हे पेटंट दाखल करणे हे आमच्या संस्थेच्या संशोधन आणि नवोपक्रमाच्या प्रतिबद्धतेचे प्रमाण आहे. आमच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय आणि वैज्ञानिक कौशल्य प्रदर्शित केले आहे, औषधनिर्माण आणि आरोग्यसेवा क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.”

वाढत्या रोगराईमुळे मागील काही वर्षांपासून केसाचे दुष्परिणाम वाढताना दिसून येत आहे. त्यामध्ये केसाची वाढ, केस तुटणे, केस लवकर पिकणे, केसांची वाढ खुंटणे असे बरेच दुष्परिणाम लहान वयामध्ये दिसून येऊ लागले आहेत. यावर योग्य उपचार करता यावा या दृष्टिकोनातून या उपक्रमावर काम केले असे या प्रोजेक्टचे मुख्य समन्वयक प्रा मनोहर केंगार यांनी सांगितले.तर या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे संशोधन करण्याची संधी मिळाली, असे अविष्कार प्रमुख प्रशांत ऐवळे यांनी सांगितले.

या प्रोजेक्टसाठी बी.फार्मसी अंतिम वर्षातील आदित्य पाटील, सोमनाथ मलाबादी, निवास हरगे, श्रुती पाटील, संजना सूर्यवंशी, धनश्री पवार, सई खोत, स्नेहा कांबळे, प्रणोती खुजट, श्रुतिका यादव, दिव्या कुंभार व द्वितीय वर्षातील जोतिरादित्य चव्हाण यांनी काम केले .या प्रोजेक्ट मध्ये विभागप्रमुख प्रा. प्रमोद चिक्कोडी, प्रा प्रशांत ऐवळे, प्रा उमेश माळी, डॉ श्रद्धा कल्याने यांचे मार्गदर्शन लाभले.

संस्थेच्या अध्यक्षा डॉ नुतन माळी व संस्थेचे सचिव डॉ रामलिंग माळी यांनी या यशाबद्दल महाविद्यालयीन संशोधन प्रमुख प्रा मनोहर केंगार व अविष्कार प्रमुख प्रशांत ऐवळे तसेच विद्यार्थ्यांचे व प्राध्यापकांचे अभिनंदन केले आणि संशोधन-केंद्रित शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याच्या महत्त्वावर भर दिला. या तरुण नवोन्मेषकांचे यश नवीन वैद्यकीय आणि निदान तंत्रज्ञान विकसित करण्यात फार्मसी व्यावसायिकांच्या वाढत्या भूमिकेवर प्रकाश टाकेल असे हि सांगितले.

प्राध्यापकांच्या व व्हेंचर सेंटर: इनक्यूबेटर फॉर इनोव्हेटिव्ह स्टारटप पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे अत्याधुनिक उपकरण तयार केले. पेटंट दाखल केल्याने त्यांच्या समर्पणाला आणि कल्पकतेला आता राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

गोविंद पाटील on आमचा वाडा…
कविता बिरारी on पहलगाम
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on स्नेहाची रेसिपी’ – १३
अजित महाडकर, ठाणे on माझी जडणघडण : ४८
विजया वाळुंज on जशाच तसे
अरविंद विनायक ढवळे on “पद्मश्री” उदय देशपांडे
पुरुषोत्तम रामकृष्ण रामदासी on माझी जडणघडण : ४८
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माध्यम गोंधळ : संनियंत्रण आवश्यक
Pratibha Saraph on काही अलक
शितल अहेर on जशाच तसे
प्रदीप पाटील on जिचे तिचे आकाश : ८