पुस्तक म्हणाले एक दिवस पुस्तकावर लिही थोडे
आम्हाला जग सारे विसरले
अन् मोबाईल ने सारे विश्व व्यापले
प्रकाश नाही पडत आता लख्ख आमचा
मिणमिणता दिवा सुद्धा झाला आता दिसेनासा
पुस्तक म्हणाले एक दिवस पुस्तकावर लिही थोडे
थोडे थोडे म्हणता म्हणता खूप सारी झाली पाने
सहज उलटले पान एक पाणी तरळले डोळ्यात
माझ्याच बद्दल माझ्या वरती लिहिण्यासाठी
शब्द नाहीत हयात…….
पुस्तक म्हणाले एक दिवस पुस्तकावर लिही थोडे
आता मात्र एक आठवण पुस्तकानंही काढली
पूर्वी आमची ऐट काही वेगळीच होती
आमच्या शिवाय ज्ञानाचा मार्ग नव्हता मोकळा
आमच्या असण्याचा मुळी आनंदच होता वेगळा
पुस्तक म्हणाले एक दिवस पुस्तकावर लिही थोडे
आठवण ऐकून पुस्तकाची मन झाले सुन्न
प्रत्येक पुस्तकाची आठवण आहे आता भिन्न
कोणी आता अडगळीत तर कोणी बुक सेल्फ मध्ये
कोणी कोणी मात्र फक्त आठवणींमध्ये …..

— रचना : सायली विघ्नेश शेंडे. डोंबिवली
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
Thank you everyone for wonderful feedbacks
खूप छान कविता, अप्रतिम 👌👌👌
Thank you
खूप सुंदर कविता केली आहेस सायली. पूर्वी अशी म्हण होती की वाचाल तर वाचाल. आता मोबाईल मुळे पुस्तके खरंच अडगळीत पडली आहेत.
वाह,
पुस्तका वाचून अडले सारे , आमच्या काळात
आता मात्र तेच अडगळीत.
सायली तुझी “पुस्तक म्हणाले” ही कविता खूपच सुंदर आणि मार्मिक आहे.
छान रचना 👌👍
अरे व्वा…छान आहे कविता…पुस्तक म्हणाले