Homeसाहित्यपाणीदार पाणी

पाणीदार पाणी

पाणीदार पाणी
दुधात पाणी
दुधाताल दूधपण
घालवलं कोणी

आणि खव्याची
खव्याची काय कथा
नी पनीर हसतो कसा
आणि खव्याची
खव्याची काय कथा
नी पनीर हसतो कसा

पाणीदार पाणी
दह्यात ही पाणी
दह्याच घट्टपण
घालवलं कोणी

आणि लोणी ची
लोणी ची काय कथा
नी तूप ते हसतो कसा
आणि लोणी ची
लोणी ची काय कथा
नी तूप ते हसतो कसा

पाणीदार पाणी
चीज बघितले का कोणी
चीज मध्ये तर काय हो
मिसळतात का पाणी

आणि बटर ची
बटर ची काय ती कथा
दूध पावडर हसतोय कसा
आणि बटर ची काय कथा
दूध पावडर हसतोय कसा

पाणीदार पाणी
दुधात पाणी
दुधातलं दूधपण
घालवलं कोणी

आणि भेसळ ची
काय असेल कथा
भेसळ हसतोय कसा
भेसळ काय असेल कथा
भेसळ हसतोय कसा.

— रचना : श्वेता गांधी. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments