Homeसाहित्यमैत्रीची चाहूल

मैत्रीची चाहूल

मैत्रीची लागता चाहूल
आठवणींचे दाटे काहूर
मैत्रीची प्रेमळ मिठी
मी आहे ना तुझ्यासाठी

वेळही तेथेच थांबावे
गप्पांचे सूर रंगावे
मनातले ओठांवर यावे
भावनांचे दार उघडावे

मायेने जवळ द्यावे
अश्रूंना वाट मिळावे
अदृश्य घाव दिसावे
प्रेमळ स्पर्शाने पुसावे

हृदयाचे कप्पे जुळावे
गुण दोषांसहित स्वीकारावे
बदलण्याचे प्रयत्न नसावे
आपले अस्तित्व जपावे

हक्काने रुसावे, चिडावे
डोक्यावरून हात फिरावे
अलगद जवळ बसावे
शांतपणे ऐकून घ्यावे

न कोणते हेवे दावे
येथे सुखाचे मेळावे
आनंद द्विगुणित करावे
दुःखही वाटून घ्यावे

अबोल्याचे कारण जाणावे
न सांगता मन वाचावे
भेटीसाठी आतुर असावे
सोबतीचे क्षण जगावे

आनंदाला उधाण यावे
निरागस नाते खुलावे
दिवसेंदिवस बहरत जावे
निर्मळ अंतकरणाने सजावे

मैत्रीचे पारडे जड असावे
अपेक्षांचे ओझे नसावे
आपलेपणाने सावरावे
ओढीने गहिवरून जावे

असे कोणी तरी असावे
जीवाला जीव देणारे
हे श्रीमंतीचे लक्षण खरे
हे श्रीमंतीचे लक्षण खरे.

रश्मी हेडे

— रचना : रश्मी हेडे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800.

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

कवयित्री आशा दळवी ,फलटण , सातारा on “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज”
मृदुला राजे on पुस्तक परिचय
डॉ. आलोक जत्राटकर on झेप : 21
Sardesai Samir on झेप : 21
Pratibha Saraph on झेप : 21
सुबोध अनंत जोशी. on माझी जीवन नौका : ६
सौ.सीमा दत्तात्रय आठवले on माझी जीवन नौका : ६