सिंगापूर स्थित लेखिका नीला बर्वे यांनी लिहिलेल्या आणि नवी मुंबई स्थित, न्यूज स्टोरी टुडे ने प्रकाशित केलेल्या “कोवळं ऊन” या कथासंग्रहाच्या प्रकाशनाच्या बातम्या विविध ठिकाणी प्रसिद्ध झाल्या. त्या सर्व माध्यम संस्थांचे मनःपूर्वक आभार.
“कोवळं ऊन” या कथासंग्रहावर आतापर्यंत…
सौ. शुभांगी पासेबंद, ठाणे यांनी गोदा परिसर, कोपरगाव, विदर्भ सत्यजित या वृत्तपत्रांसाठीसाठी,


श्री नागेश शेवाळकर यांनी दैनिक श्रमिक एकजुट, नांदेड साठी,
सौ राधिका भांडारकर, पुणे यांनी न्यूज स्टोरी टुडे पोर्टलसाठी उत्कृष्ठ परीक्षणे लिहिली आहेत.

मुंबई येथून प्रसिद्ध होणार्या महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्राच्या रविवार, दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजीच्या संवाद पुरवणी मध्ये “कोवळं ऊन” विषयी लिहून आले आहे याचा आनंद वाटतो.
लेखिका नीला बर्वे यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
सौ शुभांगी पासेबंद, श्री नागेश शेवाळकर यांचे आणि सर्व संबधित वृत्तपत्रांचे हार्दिक आभार.
*“दृष्टीक्षेपात प्रकाशने”*
न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन्स ने आतापर्यंत
१) सौ वर्षा भाबल यांचे जीवन प्रवास (आत्म चरित्र),
२) सौ रश्मी हेडे यांचे समाजभूषण 2 ( व्यक्ती चित्रण संग्रह),
३) निवृत्त पोलीस उपअधीक्षक सुनीता नाशिककर यांचे, मी पोलीस अधिकारी (पोलीस सेवेतील अनुभव),
४) निवृत्त सह सचिव श्री राजाराम जाधव यांची…
– अजिंक्यवीर (आत्म चरित्र),
– अंधारयात्री चे स्वप्न (वडिलांचे व्यक्ती चित्रण),
– हुंदके सामाजिक वेदनेचे (वैचारिक लेख संग्रह),
— चंद्रकला (कादंबरी)
५) एमटीएनएल च्या निवृत्त उप महासंचालक सौ पोर्णिमा शेंडे
यांचा पोर्णिमानंद (काव्य संग्रह),
६) शिल्पा तगलपल्लेवार गंपावार यांचे, मी शिल्पा…चंद्रपूर ते
केमन आयलंड (आत्मचरित्र)
७) दूरदर्शन चे निवृत्त संचालक श्री चंद्रकांत बर्वे यांचे सत्तरीतील सेल्फी (व्यक्ती चित्रण संग्रह),

८) दिवंगत अरुणा ठोसर दीक्षित यांच्या रोमान्स विथ रुबि या इंग्रजी नाटकाची दुसरी आवृत्ती,
९) निवृत्त माहिती संचालक श्री देवेंद्र भुजबळ यांची
— आम्ही अधिकारी झालो (यशकथा संग्रह),
— करिअरच्या नव्या दिशा (विविध कोर्सेसची सविस्तर माहिती),
— माध्यमभूषण (व्यक्ती चित्रण संग्रह)
ही पुस्तके प्रकाशित केली आहेत.

वाचनीयता आणि दर्जेदार निर्मिती यामुळे ही पुस्तके वाचक, समीक्षक यांच्या पसंतीस उतरली आहेत. काही पुस्तकांना पुरस्कार देखील मिळाले आहेत. काही पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहे.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800.
