नमस्कार मंडळी.
वाचक लिहितात… या सदरात आपलं स्वागत आहे. प्रथमतः आज पासून सुरू होणाऱ्या दीपावली सणाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली, नवं वर्ष आपणांस आनंददायी, आरोग्यदायी जावो ही मनःपूर्वक प्रार्थना.
आम्ही काही मित्रमंडळी १५ ते २३ ऑक्टोबर २०२४ दरम्यान अंदमानला गेल्यामुळे या दरम्यान पोर्टल बंद होते. तथापि, त्या आधी व त्या नंतर आलेल्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.
आपला
देवेंद्र भुजबळ (संपादक)
१
‘अस्तित्व’ खूप सुंदर रचना आणि ‘आमरसाने घात केला’ मस्तच कथा.
— अरुणा गर्जे. नांदेड
२
आमरसाने घात केला ही सुंदर स्टोरी आहे सर. पूर्वी मुलीच्या चेहऱ्याकडे मुले जास्त बघत नव्हते. आई वडील यांच्या सूचना महत्वाच्या होत्या. मुले आज्ञेनुसार वागत होते.
— शत्रुघ्न लोणारे.
निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी, नागपूर
राधिका भांडारकर लिहीत असलेल्या “माझी जडणघडण” भाग २०
प्राप्त झालेले अभिप्राय…..
१
अप्पांचे व्यक्तीमत्व छान शब्दांकित केले आहे… पुढे वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
— मानसी म्हसकर. बडोदा
२
आपल्या आयुष्यात कळत नकळत किती तरी नातेवाईक आणि सहवासातील लोकांचा समावेश होत असतो. आयुष्याच्या उत्तर काळात या जुन्या आठवणी आपली जडणघडण कशी होत गेली याचे स्मरण देत असतात.
ते उत्तम प्रकारे लिहिता येणे आहे हे तुमचे वैशिष्ट्य आहे !
— उज्ज्वला सहस्त्रबुद्धे. पुणे
३
“आप्पा” छान ओळख करुन दिलीत राधिकाताई. शेवटचे तुमचे वाक्य हीच खरी जडणघडण.
स्वाभिमान, स्वत्व मान हीच जडणघडण.
— छायाताई मठकर. पुणे
४
कुणासाठीही गॅरंटर होऊ नये.
आपल्याच परागंदा व्हायची वेळ येते. अनुभवामृत..👌👌
— प्रा.सुमती पवार. नाशिक
५
तुझे लेख क्रमांक १९/२० आज वाचले. नेहमीप्रमाणेच अतिशय सुंदर !
— आरती नचनानी. ठाणे
६
नुसते छान, सुंदर हे शब्द तोकडे पडतात तुझ्या लिखाणाला. तू अगदी सहज त्या काळात घेऊन जातेस. मलाही जीजीपेक्षा ती सवाशिण असूनही पोरकी, असहाय वाटायची.
ती मला भातावर झारीने तूप वाढायची, तिने कधी चमचाभर तूप वाढले नाही. तूपातली स्निग्धता, स्नेह तिच्या ह्रदयातून वाहतोय असं वाटायचं मला.
— अंजोर चाफेकर. मुंबई (लेखिकेची बहीण)
श्री विलास कुडके यांनी “हलकं फुलकं” सदरात लिहिलेल्या
“अवघाची वेळ सुखाने घालवीन” या लेखावरील अभिप्राय पुढीलप्रमाणे आहेत.
१
खूप छान लिहिले आहे. अभिनंदन ! गेली अनेक वर्षे मी तुमचे ललित लेखन वाचत आहे. त्यातील प्रगल्भता वाढत जाताना दिसते हे खूप आनंदाचे आणि अभिमानाचे आहे… मी या लेखाला
‘वेळ घालवण्याची कला…’ असे शीर्षक दिले असते.
— श्री प्रल्हाद जाधव. माजी संचालक (माहिती)
२
superb जबरदस्त.
— श्रीमती सुनिता कर्णिक.
३
खूप छान
— श्री लिलाधर कारभारी; श्रीमती आरती पेंडकलकर
४
मस्त
— श्री निरंजन राऊत.
५
A good description about timing made in the article. Best wishes.
— श्री दिगंबर पालवे.
६
अप्रतिम…खूप छान
आपण लेखक ही आहात तर…
— श्रीमती सुवर्णा नाईक.
७
छान लेखन 👌👌
— श्रीमती स्मिता भारतभूषण दिघे.
८
Very Good 👍
— श्री दिनेश थोरात.
९
Great
— श्री सुरेश वांदिले.
१०
मार्मिक 👌🙏🏻
— श्री संजय म्हस्के.
११
अतिसुंदर
— श्री हेमंतकुमार सावंत.
१२
एकदम छान. वेळेचे महत्व इतक्या छान पद्धतीने मांडले आहे, तुम्ही ग्रेटच आहात सर, इतकी कामे असताना इतका लिखाणाचा व्यासंग, बापरे, किती कला आहेत तुमच्याकडे, मी B. A (journalism) करूनही लिखाण करत नाही. आता तुमचा लेख वाचून लिहण्याची प्रेरणा मिळाली, धन्यवाद 🙏
— श्रीमती अनिता देशमुख वावरे
१३
अप्रतिम लेखन सर. खूपच छान👌👌
— श्रीमती भक्ती गमरे.
१४
जबरदस्त…. 💐💐💐
— श्री उध्दव खाडे.
१५
The article “Awaghachi wel Sukhane ghalwil” authored by Vilas kudke is sarcastic and have great sense of humour. It lands a blow on idle people who have ample time with no any concrete business to do. Author quotes interesting examples of these people’s attitude such as, “No time to hit flies”, “Pretending to be very busy when they have no any business to do “,. All these examples and the typical style of author are amusing. This makes u laugh while u read it. We must thank our editor Bhujbal sir and the author for giving such an article on our portal that creates joyous atmosphere in ur daily routine and drives away boredom.
— Ranjitsinh Chandel Yavatmal.
१६
अप्रतिम लेख आहे सर,
आपल्यात एक लेखक दडला आहे, हे लेख वाचून कळलं..
असंच आपली आवड जपा, म्हणजे आम्हाला छान छान लेख वाचायला मिळतील.
All the Best 💐💐🙏🏻
— संजय समाणे.
अन्य प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत.
‘बदलते पत्ते’… आयुष्यातला सर्व घरांचा हिशेब फार चांगल्या रीतीने माजी कुलगुरू डॉ. प्रा. विजयराव पांढरीपांडे यांनी मांडला असून आपल्या बदलत्या पत्त्यांचा सुंदर आलेखच विविध आठवणीने शब्दबद्ध केला आहे. मला त्यांचा हा लेख खूपच आवडला. घरासंबंधी त्यांचे विचार फारच महत्त्वाचे वाटले. आपले घर आपले आयुष्य असते. घरच आयुष्य घडवते. घर आपल्याला खऱ्या अर्थाने मोठे करते. घराच्या भिंती बोलतात.आपण जेव्हा उदास, एकटे असतो, खचलेले असतो, तर घरच आपल्याला सांभाळून ऊर्जा देत असते. घराच्या भिंतीच्या आरशात आपले अस्तित्व, रूप, स्वरूप दडलेले असते. खरंच विजयरावजींचे हे विचार सर्वांनाच निश्चितच भावतील! या लेखाबद्दल श्री विजयराव यांचे मनापासून अभिनंदन. आम्हालाही यानिमित्ताने आयुष्याच्या प्रवासातील घरांचा मागोवा घेता येईल..
— सुधाकर तोरणे.
निवृत्त माहिती संचालक, नाशिक
विजयालक्ष्मी यांनी “हृदयस्थ” या लेखाच्या अनुषंगाने सावरकर पुन्हा समजाउन सांगीतले, त्यांचे अभिनंदन.
मा. पं.हृदयनाथजींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.💐
— राजीव रसाळ. नगर
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
लहानपणी रुजवले गेलेले संस्कार वयाच्या 75 पर्यंत मनात रुंजी घालतात आणि त्या दृष्टीने जगाकडे बघायला शिकवतात हे फार मोठ श्रेय वडीलधाऱ्या माणसांचं आहे आणि ते तुम्ही अंतरंगात साठवून त्या दृष्टीने समाजाकडे बघतात त्यामुळे त्यातला भेदभाव मनाला स्पर्श करत नाही.
हे मिळालेले संस्कार हेच खरं आयुष्याच्या धन आहे त्यामुळे व्यक्तिमत्व बदलून जातात हे ही तितकच खरं.
सहजपणे वाचक पण त्या काळात प्रवेश करतात निरीक्षण ही तुम्हाला लाभलेली देणगीच आहे. खूप छान ओघवती भाषा आणि लिखाण