Sunday, July 20, 2025
Homeसाहित्यवारी : २ कविता

वारी : २ कविता

१. भाग्याची वारी

जशी विठ्ठलाला प्रिय तुळस
तशी वारी, मायेचा कळस

वारकरी असतो भक्तीत लीन
न जाणवे त्यास कोणता शीण

पाऊस, वारा याची नसे बाधा
विठ्ठलाचा भक्त अगदी साधा

हरी नामाचा गजर मुखी
भजनात देह होतो सुखी

लागली पंढरपुरीची ओढ
सावळ्या विठुचे रूप गोड

गर्व अहंकार आता तरी सोड
वारीस नाही कोणती तोड

लहान थोर सर्व समान
कपाळी तिलक सजला छान

लाखो वारकऱ्यांची खाण  
नामात विसरली भूख तहान

क्षण आनंदाचा हा जपावा
देह विठू चरणी खपावा

अखंड घडो वारीची सेवा
आत्मिक समाधानाचा हा ठेवा                        

माऊलींचा हा अनोखा मेळावा
मंदिराचा कळस ही डोलावा

डोळे भरूनी हे दृश्य पहावे
असे भाग्य आम्हा लाभावे

अध्यात्माची अदृश्य किमया
जादुई विठ्ठल भक्ताची माया

संतांचा असे अनोखा इतिहास
विठ्ठल दर्शनाची लागली ध्यास

रखुमाई देखील वाट पाही
विठू आमच्या हृदयात राही

माझा मनाचा अतूट विश्वास
मूर्ती पाहता होई स्तब्ध श्वास

अशी ही भाग्याची वारी
लाभो आम्हा जन्मभरी

रश्मी हेडे

— रचना : रश्मी हेडे.

२. भक्तवत्सल

निस्सिम ते समर्पण,
भावपूर्ण अंतःकरण,
मुखी नाम,ध्यास संपूर्ण,
तो वैष्णव जाणावा…

त्याच्यासवे काही वेळ,
कळते आपुला भाव काय ?
तो कुठे, आपुले काय ?
देव खरा त्याला कळला…

तो भाव धरून येई,
चालण्याचे कष्ट घेई,
त्याच्यापाशी धन नाही,
तरी मागणे काहीच नाही…

त्याला मीठ भाकर पुरते,
थोडे मिळता हृदयी भरते,
डोळ्यात समाधान दिसते,
त्याला गोडी नामाची असते

त्याचा नाही आवाज गोड,
पण श्रद्धा असे अनमोल,
मातीचे तो जाणतो मोल,
विरक्त असून आनंदी…

त्याच्यासाठी पांडुरंग,
सतत उभा जागृत दंग,
भजन ऐकतो टाळ मृदुंग,
प्रसन्न सदा भक्तांवरी…

हेमंत भिडे

— रचना : हेमंत भिडे. जळगाव

— निर्माती : सौ अलका भुजबळ.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माध्यमभूषण याकूब सईद
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on आनंदी जीवनासाठी समतोल आवश्यक – देवेंद्र भुजबळ
कविता बिरारी on मम गाव राहिले दूर…..
प्राची उदय जोगळेकर on सांगा, कसं जगायचं ?