Homeयशकथा"शब्दांच्या वाटेवर" : देवेंद्र भुजबळ

“शब्दांच्या वाटेवर” : देवेंद्र भुजबळ

मुंबई दूरदर्शन केंद्राच्या सह्याद्री वाहिनी वर “शब्दांच्या वाटेवर” या कार्यक्रमात सोमवारी रात्री 8.30 वाजता आणि पुन्हा मंगळवारी दुपारी 2.30 वाजता आपल्या पोर्टलचे संपादक- लेखक श्री देवेंद्र भुजबळ यांची मुलाखत प्रसारीत झाली.

मुलाखतकार पूनम चांदोरकर यांनी चांगले प्रश्न काढले होते. त्यामुळे श्री भुजबळ यांना वाचनाची आवड कशी लागली, शब्दांच्या वाटेवर ते कसे वळले, लिखाणामागची त्यांची प्रेरणा, www.newsstorytoday.com या पोर्टलची निर्मिती, पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या लेखमाला पुस्तक रुपात कशा प्रकाशित झाल्या, अन्य पुस्तकांचे संपादन, प्रकाशन अशी खूप छान मुलाखत झाली आहे.

ही मुलाखत आम्हाला पाहता न आल्याने मुलाखतीची लिंक उपलब्ध करून दिल्यास बरे होईल, असे अनेक जणांनी कळविले आहे. सुदैवाने दूरदर्शन ने देखील ही लिंक उपलब्ध करून दिल्याने ती पुढे देत आहे.

ही मुलाखत पाहून आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यास आनंद होईल.

केंद्र प्रमुख श्री राजेश दळवी, निर्माते श्री दीपक शर्मा, सहायक निर्माते श्री संजय झनके, अन्य तंत्रज्ञ, सहकारी आणि मुलाखतकार पूनम चांदोरकर आणि मुलाखत पाहून भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार.

— टीम एन एस टी. ☎️+ 91 9869484800

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. आदरणीय संपादक भुजबळ साहेब प्रथमता अभिनंदन….. परिस्थितीपेक्षा ‘मनस्थिती’ चांगली असली पाहिजे हे सुभाषित पूर्ण मुलाखतीचा गाभा आहे. कारण मी पण यातून गेलो आहे.

    8788334882

    श्री गोविंद पाटील सर जळगाव महाराष्ट्र.

  2. मनापासून अभिनंदन आणि
    आगामी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा,
    देवेंद्र साहेब..!

  3. अभिनंदन
    आदरणीय श्री. देवेंद्र भुजबळ साहेब,

    दूरदर्शनवरील ‘शब्दांच्या वाटेवर’ या कार्यक्रमात काल रात्री ८.३० वाजता प्रसारित झालेली आपली मुलाखत पाहण्याचा योग आला. सुप्रसिद्ध मुलाखतकार सौ. पूनम चांदोरकर यांनी घेतलेली ही मुलाखत अत्यंत सुंदर, प्रगल्भ आणि प्रेरणादायी झाली.

    मुलाखत सुरू असतानाच आपल्या विचारांची व्यापकता, अनुभवाची समृद्धता आणि समाजासाठी सकारात्मक कार्य करण्याची आपली तळमळ प्रकर्षाने जाणवली. कार्यक्रम संपल्यानंतरही या प्रेरणादायी संवादाची सकारात्मक ऊर्जा मनात कायम राहिली.

    संचालक पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतरही आपण थांबले नाहीत, हे विशेष कौतुकास्पद आहे. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल आणि सोशल मीडिया या विविध माध्यमांतून आपण आजही उत्साहाने, सकारात्मकतेने आणि समाजोपयोगी दृष्टिकोनातून कार्यरत आहात. आपल्या अनुभवाचा आणि लेखणीचा हा प्रवास निश्चितच अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

    आपल्या या उल्लेखनीय कार्यासाठी मनःपूर्वक अभिनंदन!
    आपल्या पुढील वाटचालीस उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अधिकाधिक यश लाभो, ही मनःपूर्वक शुभेच्छा.

    पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन व मनःपूर्वक शुभेच्छा!

    आपला स्नेहांकित,
    छायाचित्रकार : विजय होकर्णे
    नांदेड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments