Sunday, June 22, 2025
Homeसाहित्यस्वातंत्र्यवीर सावरकर जीवनक्रम

स्वातंत्र्यवीर सावरकर जीवनक्रम

१) २८ मे, १८८३ : जन्म. भगूर, जिल्हा नाशिक
२) १८९८ : चाफेकरांना फाशी : कुलस्मामिनीच्या मूर्तीसमोर सावरकरांनी सशस्त्र क्रांतीची शपथ घेतली.
३) १९०० : मित्रमेळ्याची स्थापना.
४) १९०१ : विवाह. मॅट्रिक परीक्षेत उत्तीर्ण.
५) १९०२ : फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश
६) १९०४ : मित्रमेळा हे नाव बदलून अभिनव भारत या नावाच्या गुप्त क्रांतिकारक संघटनेची स्थापना.
७) १९०५ : परदेशी कपड्यांची होळी, बी.ए. उत्तीर्ण, प्रथम पुत्र प्रभाकर याचा जन्म.
८) १९०७ : इंग्लंडला प्रयाण.
९) १९०९ : बाबारावांना जन्मपेठ : मदनलाल धिंग्रा यांनी कर्झन वायलीला ठार मारले. प्रभाकराचा मृत्यू, बॅरिस्टरी उत्तीर्ण पण न्यायमंडळाने पदवी घेण्यास नकार दिला.
१०) १९१०-११ : अटक, मार्सेलिसला समुद्रात उडी, नाशिक कटाच्या खटल्यात मालमत्ता जप्त व दोन जन्मठेपांची शिक्षा.
११) १९११ : अंदमानला रवानगी.
१२) १९१३ : अंदमानात शुद्धिकार्यास प्रांरभ.
१३) १९१५ :  येसू वहिनींचे निधन, पत्नी व धाकट्या भावाची अंदमानात भेट.
१४) १९२१ :  सावरकर बंधूंची अंदमानातून भारतात पाठवणी.
१५) १९२४ : येरवडा तुरुंगातून सशर्त सुटका. रत्नागिरीत स्थानबद्ध.
      : रत्नागिरी हिंदुसभेची स्थापना.
१६) १९२५ : अस्पृश्यता निर्मूलनाच्या कार्याला प्रांरभ.
      : भाषाशुद्धीची चळवळ सुरु. कन्या प्रभा हिचा जन्म.
१७) १९२७ : ‘श्रद्धानंद’ साप्ताहिक सुरु, रत्नागिरी येथे गांधीजी-सावरकर भेट.
१८) १९२८ : पुत्र विश्वास याचा जन्म.
१९) १९३० : रत्नागिरीत पहिले प्रकट सहभोजन.
२०) १९३१ : पतित पावन मंदिराचे उद्घाटन.
२१) १९३७ : बिनशर्त मुक्तता अहमदाबाद हिंदुमहासभेचे अध्यक्ष. पुढे १९४३ पर्यंत प्रतिवर्षी असे सलग सात वेळा अध्यक्ष.
२२) १९३८ : मुंबई येथील महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.
      : भागानगर नि:शस्त्र प्रतिकाराचे आंदोलन.
२३) १९४३ : षष्टयब्दी निमित्त भव्य सत्कार, साहित्यिकांकडून मानपत्र, सांगली येथे झालेल्या मराठी  रंगभूमीच्या शत सांवत्सरिक महोत्सवाचे अध्यक्ष.
२४) १९४८ : गांधीजींची हत्या, अटक
२५) १९४९ : गांधी हत्येच्या खटल्यातून निर्दोष मुक्तात.
२६) १९५२ : पुणे येथे अभिनव भारत सांगता समारंभ.
२७) १९५६ : लो. टिळक जन्मशताब्दी समारोहाचे अध्यक्ष, पुणे.
२८) १९५७ : सत्तावनच्या स्वातंत्र्यसमराचा शताब्दी समारोह दिल्ली येथे साजरा. तेथे सत्कार व भाषण.
२९) १९६१ : मृत्युंजय दिनानिमित्त पुण्यात भव्य सत्कार,  सावरकरांचा सामर्थ्यसंपन्न होण्याचा संदेश, प्रकट समारंभातील अखेरचे भाषण.
३०) ८ नोव्हेंबर १९६३ : पत्नी सौ. यमुनाबाई यांचे निधन.
३१) ३ फेब्रु.१९६६ :  प्रायोपवेश सुरू.
३२) २६ फेब्रुवारी १९६६ : मृत्यू.

देवेंद्र भुजबळ

— संकलन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ ९८६९४८४८००

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. स्वातंत्रवीर सावरकरांची थोडक्यात माहिती मिळाली.
    धन्यवाद सर !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सौ. सुनीता फडणीस on जिचे तिचे आकाश…: १३
सौ. सुनीता फडणीस on योग : काही कविता…
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश…: १३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on कर्करोग संशोधक डॉ सुलोचना गवांदे
ज्ञानेश्वर वि जाचक on करवंदे
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश… १२
अजित महाडकर, ठाणे on जिचे तिचे आकाश… १२
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on आपण जागे कधी होऊ ?